अब्जाधीशांच्या गणनेत भारत तिसऱ्या स्थानावर!!!

तुम्ही जर कोणताही छोटा मोठा व्यवसाय करत असाल किंवा व्यवसायासंबंधी बातम्या मध्ये आपल्याला रस असेल तर 'फोर्ब्स' हे नाव नक्कीच ऐकले असेल. 'फोर्ब्स' हे एक अमेरिकन मासिक आहे.हे जागतिक स्तरावर सर्वेक्षण करून विविध याद्या तयार करते.जसे की जागतिक स्तरावरील ताकदवान महिला, Forbes under 30, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, इत्यादी.
२०२३ मधील त्यांच्या सर्वेक्षणा नुसार पृथ्वीवरील अब्जाधीशांची संपत्ती एकत्रित केली असता १२.२० ट्रिलियन डॉलर इतकी भरेल जी गेल्या वर्षात १२.७० ट्रिलियन डॉलर इतकी होती.एक ट्रिलियन डॉलर म्हणजे १ लाख कोटी हा हिशोब लक्षात घेऊन आता पुढचे आकडे वाचू या.
गेल्या वर्षात घडलेल्या अनेक घडामोडी लक्षात घेता अब्जाधीशांसाठी हे फारसं चांगले वर्ष म्हणता येणार नाही. ट्विटरच्या महागड्या खरेदीमुळे टेस्लाचे शेअर्स बुडण्यास मदत झाली. त्यामुळे इलोन मस्क हे जगातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत आता दुसऱ्या क्रमांकावर गेलेत. त्यांच्या जागी लक्झरी वस्तूंची कंपनी LVMH चे प्रमुख बर्नार्ड अर्नाल्ट यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान पटकावले आहे.पहिल्यांदाच एक फ्रान्सचा नागरिक या यादीमध्ये आघाडीवर आहे.
या यादीत अमेरिकमध्ये अजूनही सर्वात जास्त अब्जाधीश म्हणजे ७३५ सदस्य आहेत ज्यांची एकत्रित संपत्ती ४.५० ट्रिलियन डॉलर इतकी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमंकावर आहे चीन ५६२ सदस्यांची मिळून यांची एकूण संपत्ती आहे २.० ट्रिलियन डॉलर आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे १६९ अब्जाधीशांचा देश भारत !भारतीय अब्जाधिशांची एकत्रित संपत्ती ६७५ बिलीयन डॉलर इतकी आहे.
ही यादी बनवण्यासाठी हातात असलेल्या कंपनीच्या शेअर्सचे भाव आणि इंटरनॅशनल एक्सचेंज रेट याचा अभ्यास केला जातो.
२६४० लोकांच्या या यादीमध्ये बर्नार्ड अर्नाल्ट, इलोन मस्क, जेफ बेजोस,लॅरी इल्लिसन, बिल गेट्स, इत्यादी अनेक लोक समविष्ट आहेत.
९ व्या क्रमांकावर भारतीय मुकेश अंबानी आहेत तसेच २४ व्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत.
'फोर्ब्स' च्या अधिकृत वेब साइट वर पूर्ण २६४० सदस्यांची यादी आपल्याला पाहायला मिळते.
--मोनाली कुलकर्णी