एकाचवेळी २०० कार आणि १००० प्रवासी घेऊन जाणारं रो-रो जहाज काय आहे आणि ही सेवा कुठे-कधी सुरू होतेय?
कार, ट्रक, सेमी-ट्रेलर ट्रक, ट्रेलर आणि मालगाडी यासारख्या अवजड वस्तू वाहून नेणाऱ्या गाड्यांची ने आण करण्यासाठी रो-रो वाहतूक पद्धत वापरली जाते. रो-रो वाहतुकीमुळे एकाच जहाजावर मोठ्याप्रमाणात गाड्यांचं दळणवळण शक्य होतं. ही रो रो वाहतूक सेवा आता पहिल्यांदाच मुंबईत सुरु होत आहे. त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.
२८ जानेवारी रोजी मुंबईत रो-रो वाहतूकीसाठी लागणारं जहाज ग्रीस येथून येणार आहे. या जहाजाची किंमत तब्बल ५० कोटी आहे. हवामान योग्य असेल तर मार्च पर्यंत रो-रो वाहतूक सुरु होईल. तशी ही सुविधा २०१९ च्या डिसेंबर पर्यंत सुरु होणार होती, पण काही अडचणींमुळे उशीर झाला आहे.
मुंबई आणि रायगड जिल्ह्यांच्या दरम्यान रो-रो वाहतूक सेवा सुरु होईल. तसेच मुंबई-नवी मुंबई-ठाणे या भागांना रो-रो वाहतूक जोडलेली असेल. एकाचवेळी जवळजवळ २०० कार, बस सोबतच १००० प्रवासी प्रवास करू शकतील एवढी जहाजाची क्षमता असणार आहे. हवामान जर अयोग्य असेल तर प्रवाशांची संख्या ५०० करण्यात येईल.
रो-रो वाहतुकीमुळे अलिबाग, काशीद, मुरुड भागात जाण्यासाठी रस्त्याने जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा एक तृतीयांश वेळ लागणार आहे. तुम्ही करणार का नव्या रो-रो जहाजातून प्रवास ?