मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

नातेसंबंध हे श्वासासारखे मोकळे असावेत, फासासारखे आवळलेले नकोत

3 मिनिट वाचन

उंदीर आणि बेडकाच्या मैत्रीच्या बोधकथेतून शिका की जबरदस्तीने टिकवलेली नाती कशी गुदमरवून टाकतात.

शेअर करा:
नातेसंबंध हे श्वासासारखे मोकळे असावेत, फासासारखे आवळलेले नकोत

ती जीवघेणी दोरी: उंदीर आणि बेडकाच्या मैत्रीचा एक धक्कादायक धडा !

मी आज सकाळी माझी जुनी डायरी चाळत होतो आणि लक्षात आलं की गेल्या ३ वर्षात मी अशा १० लोकांशी मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्याशी माझं कधीच पटत नव्हतं. आपण किती वेडे असतो ना? फक्त एकटे पडू नये म्हणून आपण अशा ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करतो, जिथे आपली जागाच नसते.ही माझ्या चुकीची कबुली मलाच देताना एका जुनी बोधकथा आठवली, जी आजच्या धावपळीच्या जगात अगदी चपखल बसते.

कल्पना करा, एक छोटासा उंदीर आहे. त्याला वाटतं की एका बेडकाशी मैत्री करावी. मैत्री तर झाली,पण उंदराला भीती होती की बेडूक त्याला सोडून जाईल.मग त्याने काय केलं? एक दोरी घेतली आणि आपला पाय बेडकाच्या पायाला घट्ट बांधून टाकला. त्याला वाटलं, 'आता आपण कायम सोबत राहू, एकत्र मजा करू!'

...आणि मग काय झालं? बेडूक तर पाण्यातला राजा. त्याने सवयीप्रमाणे तलावात उडी मारली आणि तो आरामात पोहू लागला. पण बिचारा उंदीर? त्याला पोहता येत नव्हतं. तो पाण्यात गुदमरला आणि काही वेळातच मेला.त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागला.इतक्यात आकाशात एक ससाणा शिकार शोधत उडत होता, त्याला पाण्यात तरंगणारा उंदीर दिसला. त्याने खाली झडप घातली आणि उंदराला आपल्या नख्यांत पकडून वर उडाला. पण उंदराचा पाय तर बेडकाला बांधलेला होता! उंदरासोबत तो जिवंत बेडूक ही आकाशात ओढला गेला.शेवटी एका उंच कड्यावर आदळून त्या दोघांचाही अंत झाला.

आपल्याला वाटतं की उंदीर बेडकामुळे मेला आणि बेडूक ससाण्यामुळे मेला ? नाही तसं नाही,त्या दोघांना 'दोरीने' मारलं, ज्या दोरीने त्यांना जबरदस्तीने एका नात्याने गुंतवून ठेवलं होतं.

आपल्या आयुष्यातही असंच होतं, मंडळी. जिथे आपण 'फिट' होत नाही, तिथे आपण उगाचच सामावून जाण्याचा प्रयत्न करतो.

सोशल मीडियावर सध्या 'रिलेशनशिप डिटॉक्स'चा जो ट्रेंड सुरू आहे, तो उगाच नाही. आपण जितका जास्त ओढून-ताणून नातं टिकवायचा प्रयत्न करतो, तितकेच आपण आतून तुटत जातो.

जबरदस्तीची नाती कधीच सुकून देत नाहीत, ती फक्त गुदमरवून टाकतात. विचार करा, तुमच्या आयुष्यातही अशी एखादी 'दोरी' तर नाही ना, जी तुम्हाला नको असलेल्या दिशेला ओढून नेतेय?

नातेसंबंध हे श्वासासारखे मोकळे असावेत,फासासारखे आवळलेले नकोत, नाही का?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!
लाइफस्टाइल

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!

फुकट मिळणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी आणि भविष्यातील पाणी टंचाईच्या संकटावर प्रकाश टाकणारा विचारप्रवर्तक लेख.

१० जून, २०२६

‘जॉली!’: शाळेच्या दिवसांमधली फाउंटन पेनची शाई आणि निरागस मैत्री
लाइफस्टाइल

‘जॉली!’: शाळेच्या दिवसांमधली फाउंटन पेनची शाई आणि निरागस मैत्री

शाळेच्या काळात फाउंटन पेनच्या शाईने खेळला जाणारा 'जॉली' हा खेळ आणि त्याभोवती गुंफलेल्या शालेय मैत्रीच्या हळव्या आठवणी.

११ सप्टेंबर, २०२६

मनगटावरचं घड्याळ: डिजिटल गोंधळातला तुमचा 'शांत' सोबती
लाइफस्टाइल

मनगटावरचं घड्याळ: डिजिटल गोंधळातला तुमचा 'शांत' सोबती

स्मार्टफोनच्या डिजिटल गोंधळात मनगटावरचं साधे ॲनालॉग घड्याळ आपल्याला विचलित न होता वेळेवर नियंत्रण मिळवायला मदत करते.

२६ जून, २०२६