अजब चीनमधलं आणखी एक गजब ! बुटक्या गावकर्‍यांचं बुटकं गाव !!

मंडळी आफ्रिकेत गेल्यावर श्वेतवर्णी भेटतील, अमेरिकेत गेल्यावर गौरवर्णी भेटतील. आणि आम्ही ज्या गावाविषयी सांगणार आहोत त्या गावात तुम्हाला चक्क सगळेच बुटके भेटतील. मंडळी भौगीलिक परिस्थती नुसार चेहरेपट्टी आणि रंगात साम्य आढळून येतं पण जर एखाद्या गावात सगळेच बुटके असतील तर याला काय म्हणावं ?

चीन मधल्या यांग्सी गाव हे बुटक्यांच गाव म्हणून ओळखलं जातं. या गावातील अर्ध्याहून अधिक लोक हे बुटके आहेत. गावातील एकूण ८० लोकांपैकी तब्बल ३६ लोक बुटके आहेत. यातील सर्वात उंच व्यक्ती हा ३ फुट उंचीचा असून सर्वात लहान २ फुट उंचीचा आहे. या गावाची खंत म्हणजे कोणीही ४ फुटापेक्षा जास्त वाढत नाही.

स्रोत

गावकऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे फार वर्षापूर्वी एका रोगाने गावात शिरकाव केला होता. ज्याचा परिणाम ५ ते ७ वयातील मुलांवर झाला. या मुलांची वाढ खुंटली. हे इथेच थांबलं नाही तर तो एक अनुवांशिक रोग झाला. अशा प्रकारे गावात बुटक्यांची संख्या वाढू लागली.

या गावात जाण्यासाठी चीनी सरकारने बंदी घातली आहे. या गावातील काही फोटो आणि तिथल्या समजुती जगासमोर आल्यानंतर सगळीकडे याची चर्चा सुरु झाली.

स्रोत

मंडळी या गावातील लोक बुटके का आहेत याबद्दल चीनी सरकार उदासीन आहे. याचं नक्की कारण समजलेलं नाही. एक कारण तर हेही सांगितलं जातं की जपानने चीनवर हल्ला केल्यानंतर जो विषारी वायू सोडला त्याचा हा परिणाम आहे.

मंडळी, कारण काहीही असलं तरी हे गाव जगातील सर्वात विचित्र गावांपैकी एक आहे यात शंका नाही.
 

आणखी वाचा :

अय्या...चीनमध्ये लहान मुलं घालतात भोक असलेली चड्डी !!

जगातलं सर्वात श्रीमंत गाव : या गावाबद्दल वाचून सगळ्यांनाच हेवा वाटेल !

सबस्क्राईब करा

* indicates required