computer

महात्मा गांधींबद्दलच्या १० गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच माहित नसतील..

आज 2 आक्टोबर म्हणजेच गांधीजींचा जन्मदिन. त्या निमित्ताने जाणून घेऊया राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या   अजून खूप लोकांना माहित नाहीत.

1. ज्या इंग्रजांविरुद्ध गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्याच इंग्रजांनी गांधीजींच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या गौरवार्थ पोस्ट तिकीट सुरु केले.

2. शांतता आणि अहिंसेचं प्रतिक असणाऱ्या गांधीजींना सर्वोच्च अशा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी चक्क 5 वेळा नामांकन मिळालं होतं. पण ज्यावर्षी हा पुरस्कार त्यांना द्यायचा ठरला त्याच वर्षी गांधीजींचा मृत्यू झाला.

3. गांधीजी दिवसाकाठी सरासरी 18 किलोमीटर चालायचे. म्हणजेच त्यांच्या 40 वर्षांच्या कारकीर्दीत ते 79,000 किलोमीटर चालले. विचार केला तर हे अंतर दोनवेळा जगप्रवास करण्याइतके होईल!!

4. अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्स हा गांधीजींचा चाहता होता. तो गांधीजींसारखाच गोल भिंगाचा चष्मा वापरायचा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा गांधीजीना आपले आदर्श मानतात.

5. भारतातील 53 मोठ्या रस्त्यांना आणि विदेशातील 48 मार्गांना गांधीजींचं नाव दिलं गेलंय. यात लहान रस्त्यांची संख्या वेगळी आहे. प्रत्येक शहरात एक तरी रोड गांधीजींच्या नावाने असतोच असतो.

6. गांधीजींनी आपल्या उभ्या आयुष्यात कधीही विमानप्रवास केला नाही. त्यांना फोटोग्राफी आणि सिनेमा आवडत नसे. पण शेवटचा काही काळ त्यांनी रेडीओ वरून लोकांना संबोधीत केले.

7. गांधीजींचा जन्म, भारताला स्वातंत्र्य आणि गांधीजींचा मृत्यू अशा तीनही गोष्टी शुक्रवारीच घडल्या.

8. आपल्याकडे 2 आक्टोबर या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. अमेरिकेने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केलाय

9. गांधीजींच्या जवळ नेहमी दातांची एक कवळी असायची जी ते आपल्या कापडात बांधून ठेवायचे. ही कवळी ते फक्त जेवताना तोंडात घालायचे.

10. हिटलर, टॉलस्टॉय, आईनस्टाईन अशा जगद्विख्यात लोकांबरोबर गांधीजी नेहमी संवाद साधायचे. या लोकांच्यात नेहमी विविध विषयांवर पत्रव्यवहार होत असत. आईनस्टाईन गांधीजींचा चांगला प्रशंसक होते..

सबस्क्राईब करा

* indicates required