भारतीय सेनेचे स्पेशल अॉपरेशन यशस्वी : असा होता सर्जिकल स्ट्राईक
" मोदी हे शांत बसणारे नेता नाहीत, त्यांच्या संयमाची परिक्षा पाहू नका" असा इशारा अमेरिकेचं वृत्तपत्र वॉल स्ट्रीटने पाकिस्तानला दिला होता. तोच इशारा भारताने खरा करून दाखवला आणि बुधवारी रात्री झोपेत असणाऱ्या उन्मत्त पाकिस्तानला भारतीय सेनेनं ’सर्जिकल स्ट्राईक” करून चांगलाच दणका दिला.
काय असतं हे सर्जिकल स्ट्राईक?
सर्जिकल स्ट्राईक जणू एक सरप्राईज हल्ला असतो. ज्यात गाफिल असलेल्या शत्रूवर अचानक हल्ला करून त्याचं जास्तीत जास्त नुकसान केलं जातं आणि तेही गुप्तपणे. अमेरिकेनं पाकिस्तानात जाऊन केलेला ओसामा बिन लादेनचा खातमा हे यापूर्वीचं सर्जिकल स्ट्राईकचं एक उत्तम उदाहरण...
असा झाला यशस्वी सर्जिकल स्ट्राईक..
बुधवारची रात्र. १२:३० ते ४:३० या वेळेत भारतीय पॅराकमांडोजनी हेलीकॉप्टर आणि ड्रोन्सच्या मदतीने लाईन अॉफ कंट्रोलच्या ३ किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे ७ तळ उध्वस्त केले. ना मिडीयाला याची खबर होती ना शत्रूला. स्पेशल कंमाडोजच्या या ७ तुकड्या जवळपास ३८ दहशतवाद्यांचा निकाल लाऊन करून पहाटे सहीसलामत परत आल्या आणि तेही या अॉपरेशनचं व्हिडीओ रेकॉर्डिंग घेऊन!! दरम्यानच्या काळात या संपूर्ण हालचालीच्या प्रत्येक अपडेटवर प्रत्यक्ष पंतप्रधान लक्ष ठेवून होते.
एकंदरीत संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेली भारताची भूमिका आता उघड झालीय. भारताने नेहमीप्रमाणे नेभळटपणाचा आव आणत पुन्हा पुन्हा ’अंतिम इशारे’ न देता अचानक पाकिस्तानच्या वर्मावर घाव घातलाय. कदाचित ही फक्त सुरुवातही असू शकते..