मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

१८ कॅरेट सोन्याचं टॉयलेट वापरण्यासाठी लागल्या रांगा..

2 मिनिट वाचन
शेअर करा:
१८ कॅरेट सोन्याचं टॉयलेट वापरण्यासाठी लागल्या रांगा..

म्युझियममध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीला हात लाऊ देत नाहीत. एकतर लोक वस्तू खराब करतात किंवा मग सतत हात लावल्याने त्या वस्तूची झीजपण होते. आपल्याकडे नाही का, लोकांनी चांगदेवाच्या भिंतीचे तुकडे खरवडून देवघरात ठेवायला नेले म्हणून त्या भिंतीला हात लावू देत नाहीत आणि विठ्ठलाच्या पायावर सतत डोकं ठेवल्यानं पायाची झीज झाली म्हणून आता विठ्ठलाचं ही मुखदर्शनच मिळतं. अशा परिस्थितीत तुम्हाला एका म्युझियममध्ये  चक्क सोन्याचं टॉयलेट आहे आणि ते वापरायला ही मिळेल असं कळलं तर?

तर हे १८कॅरेट सोन्यापासून बनलेलं आणि वापरण्यायोग्य असं टॉयलेट आहे न्यूयॉर्कच्या गग्गनहेम(Guggenheim) म्युझियम मध्ये.. याचा कर्ता करविता आहे मॉरिझिओ कॅटलन. त्याच्या आणि म्युझियमच्या क्युरेटर नॅन्सी स्पेक्टर यांचं म्हणणं आहे  की, " ही  ९९ टक्के लोकांसाठी  असलेली १% कला आहे". या  टॉयलेटला नांवही मोठं गमतीशीर दिलंय- "अमेरिका". तर या अमेरिकेवर शी-शू करायची संधी या गग्गनहेम म्युझियमने या १५ सप्टेंबरपासून लोकांना उपलब्ध करून दिलीय आणि ती संधी घेण्यासाठी लोक रांगा लाऊन उभेही असतात. म्हणजे पाहा, आजूबाजूला इतर टॉयलेट्स असतानासुद्धा लोक इथं दोन-दोन तास रांगा लाऊन उभे असतात, मग येणारा-जाणारा इथे का रांग लागलीय म्हणून आश्चर्यानं विचारतो, आणि मग गार्ड नाहीतर रांगेतले लोक सांगतात,"टॉयलेट वापरण्यासाठी"!! 

इतर टॉयलेट सारखं हे सुद्धा दिवसातून बरेच वेळा साफ करावं लागतं आणि अर्थातच सोन्याचं असल्यानं त्याची विशेष काळजी घ्यावी लागतेय. त्यासाठी मग गरम वाफेच्या फवारे आणि पुसण्यासाठी स्पेशल कपडे याची तरतूद केली गेलीय. आधीपासून या सोन्याच्या संडासाच्या भांड्याची इतकी जाहिरात झाली होती, की ज्या दिवशी हे जनतेसाठी खुलं केलं, त्या दिवशी ते अतिवापरानं ब्लॉकही झालं होतं. अर्थातच मग साफ करणार्‍या टीमला बोलावणी गेली होती. 

असो.  गग्गनहेम म्युझियममधल्या या विचित्र वस्तूचं नक्की वजन आणि किंमत त्यांनी अजून तरी जाहीर केली नाही. पण वापरलेले दागिने मोडताना सोनार घट  धरतो म्हणून काळजी करणाऱ्या आपल्यासारख्यांचा हे सोन्याचं टॉयलेट बघून जीव थोडा-थोडा होतो, नाही??

पुढची गोष्ट
लाइफस्टाइल१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!जोयअलुक्कास या भारतीय कंपनीने दुबईत १६ किलोहून अधिक वजनाच्या सोन्याच्या भव्य झुमक्यांची निर्मिती केली आहे. ‘मयूर सहस्र’ असे नाव असलेले हे झुमके २२ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले आहेत.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सोन्याचं नाणं, डिजिटल गोल्ड की गोल्ड ETF: फरक काय?
लाइफस्टाइल

सोन्याचं नाणं, डिजिटल गोल्ड की गोल्ड ETF: फरक काय?

सोन्याचं नाणं, ॲपवरचं डिजिटल गोल्ड आणि शेअर बाजारातला गोल्ड ETF: GST, इतर खर्च, साठवणूक, विक्री आणि SEBI नियमन यातला फरक, एका तुलनात्मक तक्त्यासह.

३ नोव्हेंबर, २०२६

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी
लाइफस्टाइल

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी

या देशाचे उत्पन्न दोन प्रकारच्या सोन्यावर अवलंबून आहे: खाणीतले सोने आणि कापूस. तरीही ५०% हून अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जगते आहे.

३० ऑक्टोबर, २०२६

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?
लाइफस्टाइल

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?

भारतीयांच्या सोन्यावर बंदी घालणाऱ्या १९६८ च्या गोल्ड कंट्रोल ॲक्टचा अजब इतिहास आणि त्यामुळे सुरू झालेली तस्करी.

१७ ऑगस्ट, २०२६

गोव्यातील ५,५८४ कुटुंबांच्या सोन्याची ३० वर्षांची 'कैद'; आजच्याच दिवशी परतला तो खजिना!
लाइफस्टाइल

गोव्यातील ५,५८४ कुटुंबांच्या सोन्याची ३० वर्षांची 'कैद'; आजच्याच दिवशी परतला तो खजिना!

पोर्तुगीजांनी पळवून नेलेले गोवेकरांचे ५,५८४ दागिन्यांची पाकिटे ३० वर्षांच्या मुत्सद्देगिरीनंतर ३ ऑगस्ट १९९१ रोजी भारतात परत आली.

३ ऑगस्ट, २०२६

कपाटातून क्लाउडपर्यंत: सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार
लाइफस्टाइल

कपाटातून क्लाउडपर्यंत: सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार

सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा मार्ग: इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) म्हणजे काय आणि ते डिजिटल युगात कसे फायदेशीर आहे, याबद्दलची माहिती.

१० मे, २०२६