मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!

1 मिनिट वाचन

जोयअलुक्कास या भारतीय कंपनीने दुबईत १६ किलोहून अधिक वजनाच्या सोन्याच्या भव्य झुमक्यांची निर्मिती केली आहे. ‘मयूर सहस्र’ असे नाव असलेले हे झुमके २२ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले आहेत.

शेअर करा:
१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!

झुमका आया रे,दुबईके बाजार में -

जोयअलुक्कास या भारतीय कंपनीने दुबईत १६ किलोहून अधिक वजनाच्या सोन्याच्या भव्य झुमक्यांची निर्मिती केली आहे. पारंपरिक भारतीय दागिन्यांचे हे भव्य रूप पाहणाऱ्यांसाठी एक विलक्षण आकर्षण ठरले आहे. ‘मयूर सहस्र’ (Mayura Sahasra) असे नाव असलेले हे झुमके २२ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले असून, जोयालुक्कास ज्वेलरीने अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर त्यांची निर्मिती केली आहे. लग्नसमारंभ आणि सणावाराच्या प्रसंगी महिलांनी परिधान केलेल्या नाजूक, पारंपरिक झुमक्यांपेक्षा हे दागिने आकाराने कितीतरी भव्य आहेत.

२४ ऑक्टोबर रोजी दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमधील ‘ज्वेल ऑफ जॉय’ या शोरूममध्ये या झुमक्यांचे अनावरण करण्यात आले.गल्फ न्यूज-च्या वृत्तानुसार, या सोहळ्याला संयुक्त अरब अमिरातीचे अर्थव्यवस्था आणि पर्यटनमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मरी उपस्थित होते.या झुमक्यांची लांबी १.२१५ मीटर, तर व्यास ०.६८२ मीटर आहे.या भव्य झुमक्यांची निर्मिती करण्यासाठी ५५ कुशल कारागिरांनी अनेक महिने मेहनत घेतली. हे दागिने पूर्ण करण्यासाठी एकूण ५,८४० तासांचे श्रम खर्ची पडले.

आता याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा !

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी
लाइफस्टाइल

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी

या देशाचे उत्पन्न दोन प्रकारच्या सोन्यावर अवलंबून आहे: खाणीतले सोने आणि कापूस. तरीही ५०% हून अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जगते आहे.

३० ऑक्टोबर, २०२६

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट
लाइफस्टाइल

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.

२ नोव्हेंबर, २०२६

खऱ्या छापखान्यात छापल्या 'बनावट' नोटा: पोर्तुगालला हादरवणारा घोटाळा
लाइफस्टाइल

खऱ्या छापखान्यात छापल्या 'बनावट' नोटा: पोर्तुगालला हादरवणारा घोटाळा

नोट खऱ्या सरकारी छापखान्यात, खऱ्या साच्यावर छापलेली असेल, तर ती बनावट कशी ठरणार? जवळपास शंभर वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये एका महाभामट्याने हाच प्रश्न प्रत्यक्षात उतरवला.

२ नोव्हेंबर, २०२६

३८ जणांची हत्या करून मांस खाल्ल्याचा आरोप: युगांडातील भयावह प्रकरण
लाइफस्टाइल

३८ जणांची हत्या करून मांस खाल्ल्याचा आरोप: युगांडातील भयावह प्रकरण

माणूस माणसाला खातो? युगांडात मुजुरिझी मोझेस नावाच्या व्यक्तीवर पंधरा वर्षांत ३८ जणांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे. हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

३० ऑक्टोबर, २०२६

एका कांद्यातून फुलणारा रंगोत्सव! अमरिलिस फुलांची लागवड कशी करावी?
लाइफस्टाइल

एका कांद्यातून फुलणारा रंगोत्सव! अमरिलिस फुलांची लागवड कशी करावी?

अमरिलिस हे देखण्या, मोठ्या आणि आकर्षक फुलांसाठी ओळखले जाणारे शोभिवंत फूल आहे. एका कंदातूनही फुलांचा भव्य गुच्छ फुलू शकतो. आपल्या घरी या फुलांची लागवड कशी करावी, याची ही सविस्तर माहिती.

२८ ऑक्टोबर, २०२६

८६ कोटींचे ३८००० कोटी! कोण आहेत स्टार्टअप दुनियेचे हे 'गॉडफादर'?
लाइफस्टाइल

८६ कोटींचे ३८००० कोटी! कोण आहेत स्टार्टअप दुनियेचे हे 'गॉडफादर'?

ज्या काळात झोमॅटोचं बिझिनेस मॉडेल हसण्यावारी नेण्याचा विषय होता, त्या काळी संजीव बिखचंदानी यांनी ८६ कोटी रुपये गुंतवले. आज त्या गुंतवणुकीचे ३८००० कोटी झाले आहेत. 'स्टार्ट-अप'च्या दुनियेचे गॉडफादर मानल्या जाणाऱ्या संजीव यांचा हा थक्क करणारा प्रवास.

२७ ऑक्टोबर, २०२६