मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

एका विचित्र अपघातात २९००० फूटावरून काही सेकंदातच जमिनीवर कोसळले हे विमान !

2 मिनिट वाचन
शेअर करा:
एका विचित्र अपघातात २९००० फूटावरून काही सेकंदातच जमिनीवर कोसळले हे विमान !

चायना इस्टर्न एअरलाइन्सचे एक विमान,गंतव्यस्थानाच्या विमानतळापासून  काहीच अंतरावर असताना अचानक एखाद्या दगडासारखे थेट जमिनीवर कोसळल्याची बातमी आहे. विमानातील १३२ प्रवासी प्राणाला मुकले आहेत.विमानाचे अपघात होत असतात पण ग्वांग्झू शहराकडे निघालेले हे विमान तसे नेहेमी प्रमाणेच उड्डाण करत होते आणि अचानक सरळ एका रेषेत सूर मारल्यासारखे कसे कोसळले याचे सर्व तज्ञांना आश्चर्य वाटते आहे.

एका विचित्र अपघातात २९००० फूटावरून काही सेकंदातच जमिनीवर कोसळले हे विमान ! – चित्र 1

विमानतळापासून १०० किलोमीटर अंतरावर -आकाशात २९०००  फूट उंचीवर असताना- फ्लाइट MU5735 एका क्षणात  कोसळले. सर्वसाधारणपणे विमानतळ इतक्या अंतरावर असताना पायलट लँडींगच्या तयारीत हळूहळू कमी उंचीवर आणत असतो. अपघात झाला तरी विमान हेलकावे खात खात कमी कमी उंचीवर येऊन कोसळते. पण हे विमान अक्षरशः काही सेकंदातव कसे कोसळले हे गूढ आहे.२६००० फूटापासून पुढे केवळ ९५ सेकंदात विमान जमिनीवर कोसळले. त्या अगोदरच कॉकपीट आणि फ्लाइत डेटा रेकॉर्डर बंद पडला होता.  737-800 बनावटीचे विमान असे कधीच कोसळत नाही.

NTSB  च्या तज्ञांच्या मते हे विमान वैमानीकाने आत्मघातकी प्रयत्नानेच पाडले असावे.पण उपलब्ध असलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष काढणे असेही NTSB च्या एका तज्ञाने म्हटले आहे.पायलटला अचानक हार्ट अटॅक येऊन त्याचे डोके कंट्रोल पॅनेलवर आदळल्याने किंवा विमानाचे नाक वर घेणार्‍या मोटर्स बंद पदल्यानेही असे घडू शकते. 

घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या खाणीत काम करणार्‍यांनी हे शेवटचे क्षण टिपले आहेत . सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलतेजस विमानाचा नेमका काय 'लोचा' झालाय? HAL चे शेअर्स का पडले?तेजस विमानाचे अपघात आणि इंजिन मिळण्यास होणारा विलंब यामुळे HAL चे शेअर्स गडगडले आहेत. या तांत्रिक अडचणींमागील नेमके कारण काय?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

जगाची मंदी आणि या माणसाची चांदी: एका वर्षात ३३ हजार कोटी कमावणाऱ्या जॉन पॉलसनची गोष्ट
लाइफस्टाइल

जगाची मंदी आणि या माणसाची चांदी: एका वर्षात ३३ हजार कोटी कमावणाऱ्या जॉन पॉलसनची गोष्ट

२००७ च्या जागतिक आर्थिक मंदीत घरांच्या बाजाराविरुद्ध पैज लावून एका वर्षात स्वतःसाठी ३३,००० कोटी रुपये कमावणाऱ्या जॉन पॉलसनची थरारक कथा.

२० ऑगस्ट, २०२६

मृत्यूचा भीषण वेग: १९५५ चा 'ली मान्स' थरार ज्याने जगाचा काळजाचा ठोका चुकवला
क्रीडा

मृत्यूचा भीषण वेग: १९५५ चा 'ली मान्स' थरार ज्याने जगाचा काळजाचा ठोका चुकवला

१९५५ मध्ये फ्रान्सच्या 'ली मान्स' सर्किटवर झालेल्या भीषण अपघातात ८४ जणांचा बळी कसा गेला? रेसिंग जगताला हादरवून सोडणाऱ्या त्या काळ्या दिवसाची कथा.

१२ एप्रिल, २०२६