मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मृत्यूचा भीषण वेग: १९५५ चा 'ली मान्स' थरार ज्याने जगाचा काळजाचा ठोका चुकवला

3 मिनिट वाचन

१९५५ मध्ये फ्रान्सच्या 'ली मान्स' सर्किटवर झालेल्या भीषण अपघातात ८४ जणांचा बळी कसा गेला? रेसिंग जगताला हादरवून सोडणाऱ्या त्या काळ्या दिवसाची कथा.

शेअर करा:
मृत्यूचा भीषण वेग: १९५५ चा 'ली मान्स' थरार ज्याने जगाचा काळजाचा ठोका चुकवला

मृत्यूचा भीषण वेग: १९५५ चा 'ली मान्स' थरार ज्याने जगाचा काळजाचा ठोका चुकवलाजून ११, १९५५. फ्रान्समधल्या सार्ध प्रांतातलं 'ली मान्स' सर्किट. संध्याकाळचे ६ वाजून २६ मिनिटं झाली होती. सव्वा दोन लाख प्रेक्षकांच्या अंगात एक वेगळीच नशा संचारली होती. जगातील सर्वात आव्हानात्मक समजली जाणारी '२४ तास चालणारी' ही शर्यत आपल्या ३५ व्या लॅपवर होती. हवेत जळलेल्या रबराचा आणि पेट्रोलचा संमिश्र वास दरवळत होता. कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या फक्त १० सेकंदात या उत्सवाचं रूपांतर स्मशानशांततेत होणार आहे.

गोष्ट अशी आहे की, त्या काळी कार रेसिंग म्हणजे केवळ खेळ नव्हता, तर ते मृत्यूशी केलेलं एक धाडस होतं. जॅग्वार, मर्सिडीज आणि फेरारी यांसारख्या बलाढ्य कंपन्या आपली ताकद आजमावत होत्या. मर्सिडीजचा अनुभवी ड्रायव्हर पिअर लेवेघ आपली '300 SLR' ही सिल्व्हर रंगाची कार ताशी २४० किलोमीटरच्या वेगाने पळवत होता. आता एक थरारक ट्विस्ट !!! जॅग्वारचा ड्रायव्हर माईक हॉथॉर्न अचानक पिट-स्टॉपसाठी थांबला. त्याला वाचवण्यासाठी मागच्या लान्स मॅकलिनने आपली कार डावीकडे वळवली आणि थेट लेवेघच्या मर्सिडीजच्या मार्गात आली. लेवेघला सा सावरायला वेळच मिळाला नाही. त्याची मर्सिडीज मॅकलिनच्या कारवर आदळली आणि एका विमानासारखी हवेत झेपावली.लेवेघची कार थेट प्रेक्षकांच्या गॅलरीवर जाऊन आदळली. कारचं इंजिन, रेडिएटर आणि पुढचा आस (axle) एखाद्या तोफेच्या गोळ्यासारखे गर्दीत घुसले. कारचा पुढचा भाग, जो मॅग्नेशियमचा बनलेला होता, त्याने पेट घेतला. हे इतकं भीषण होतं की, जेव्हा बचाव पथकाने त्यावर पाणी टाकलं, तेव्हा मॅग्नेशियममुळे ती आग कमी होण्याऐवजी अधिकच भडकली. लेवेघचा जागीच मृत्यू झाला आणि त्याच्यासोबत जवळपास ८४ प्रेक्षक मृत्यूच्या दाढेत ओढले गेले.

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा भीषण अपघात होऊनही शर्यत थांबवण्यात आली नाही! का? कारण आयोजकांना वाटलं की जर शर्यत थांबवली आणि प्रेक्षक बाहेर पडले, तर रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे जखमींना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्स अडकून पडतील. रक्ताचे सडे पडलेले असतानाही कार्स वेगाने धावत होत्या.या घटनेने संपूर्ण जग हादरलं. फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांनी मोटारस्पोर्ट्सवर तातडीने बंदी घातली. स्वित्झर्लंडने तर ही बंदी इतकी कडक पाळली की तब्बल ६७ वर्षे तिथे कोणतीही सर्किट रेस झाली नाही. आता यामध्ये एक ताजं अपडेट आहे. जरी २०२२ मध्ये स्वित्झर्लंडने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता, तरीही त्याची अधिकृत अंमलबजावणी आणि कायद्यातील बदल १ जून २०२६ पासून (म्हणजेच येत्या काही दिवसांत) लागू होणार आहेत. तब्बल सात दशकांनंतर स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा इंजिनचा आवाज अधिकृतपणे घुमणार आहे.

आज आपण ज्या 'फिच बॅरियर्स' (रस्त्यावरील वाळूने भरलेली पिंपे) किंवा आधुनिक सुरक्षेच्या सोयी बघतो, त्यामागे या भीषण अपघाताची काळी सावली आहे. लेवेघचा सहकारी जॉन फिच याने हा अपघात डोळ्यांनी पाहिला होता आणि त्यानंतर त्याने आपलं आयुष्य रेसिंग सुरक्षित करण्यासाठी वेचलं.वेग हा आनंद देतो हे खरं, पण तो जेव्हा सीमा ओलांडतो, तेव्हा इतिहास रक्तात लिहिला जातो, हेच या घटनेतून आपल्याला समजतं.एका चुकीच्या निर्णयाने ८० हून अधिक लोकांचे प्राण घेतले, पण त्याच अपघाताने आजच्या रेसिंग जगताला सुरक्षेचे धडे दिलेकाय वाटतं तुम्हाला, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी चुकांना विज्ञानाकडे काही उत्तर आहे का?

पुढची गोष्ट
क्रीडाहजारो कोटींचे उत्पन्न आणि शून्य रुपये इन्कम टॅक्स ! काय भानगड आहे ही ? वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख