मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

सचिनची फलंदाजी मोठ्या पडद्यावर...बघा ट्रेलर !!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
सचिनची फलंदाजी मोठ्या पडद्यावर...बघा ट्रेलर !!!

जसं सेहवाग म्हणतो की ‘कोणतंही तंत्रज्ञान दुसरा सचिन घडवू शकत नाही !’ तसच काहीसं आमचं देखील झालं आहे. सचिनवर सचिनच्या कामाइतकंच उदंड लिहिता येईल. कितीही लेखणी खरडली तरी सचिन पूर्ण सांगून होणार नाही !!!

काल सचिनच्या बायोपिकचा ट्रेलर आला. त्यात सचिन म्हणतो कि ‘क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं होतं.’ त्याचा एक फॅन म्हणून आम्हाला एवढंच सांगावसं वाटत कि सचिनला क्रिकेट खेळताना बघणं म्हणजे आमच्यासाठी देवाला गाभाऱ्यात बघण्यासारखचं होतं.

२६ मे रोजी सचिन मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. एखाद्या भारतरत्नाच्या हयातीत त्याचा जीवनपट उलगडण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ असावी.

सिनेमा येईल तेव्हा आपण सारे सिनेमा बघूच पण त्या आधी हा ट्रेलर बघा आणि ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा !!!

 

हा आहे सचिनच्या बॅटचा डॉक्टर : भेटा राम भंडारी यांना...

येत्या काळात येऊ घातलेले १० भन्नाट बायोपिक्स !!!

ऐका हो ऐका! सचिनच्या सिनेमाच्या रिलीजची तारीख आलीय...

 

 

टॅग्स:

संबंधित लेख