धगधगीत गरम तवा, त्याचा चुरचुरणारा आवाज.. सोबत धुपारती केल्यासारखा धुराचा लोट आणि पोटात भुकेचा आगडोंब पसरवणारा बटरचा घमघमाट म्हणजे आलं... सिझलर टेबलवर आलं!! गरम तव्यासकट टेबलवर सिझलर जेव्हा येतं तेव्हा आजूबाजूच्या टेबलवरची मंडळी कौतुकानं आदरानं तुमच्याकडे बघायला लागतात. वेगवेगळ्या भाज्या , चिकन , फ्रेंच फ्राइज यानी सजलेला तवा एखाद्या परदेशी पाककृती सारखा वाटतो. पण नावाने विदेशी असलेलं म्हणजे सिझलर हा अस्सल देशी खाद्यप्रकार आहे. (विश्वास बसणं कठीण आहे पण सिझलर अस्सल भारतीय पदार्थ आहे.)
ठाण्यातल्या सिझल देसी या रेस्टॉरंटमध्ये शेफ पराग जोगळेकर यांनी तर आता खास चतुर्थीसाठी उपासाचे सिझलर्स आणले आहेत. साबुदाण्याचे वडे -खिचडी-रताळ्याचा किस आणि बटाट्याच्या तळलेल्या काचर्यांनी गच्च भरलेलं हे उपासाचं सिझलर जेव्हा तुमच्यासमोर येतं, तेव्हा आज उपास आहे याचा पण विसर पडतो. खास मराठी परंपरेत बसणारं सिझलर फक्त चतुर्थीलाच त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतं. इतर दिवशी सिझलरचे बाकी सर्व प्रकार सिझल देसीमध्ये मिळतात.
श्रीगणेश जयंतीसाठी खास -उपासाचे सिझलर
1 मिनिट वाचन

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

लाइफस्टाइल
पेटीएम बंद पडणार आहे म्हणे, पेटीएमचा काय झोल झाला आहे ?
१२ फेब्रुवारी, २०२४

लाइफस्टाइल
गाण्यांच्या आवडीवरून 'जनरेशन गॅप' मोजायची बोभाटाची सोप्पी पध्दत आज वाचा !
१५ मार्च, २०२५

लाइफस्टाइल
गेल्या शतकातील स्त्रीजीवन कसं होतं हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचाच !
३ फेब्रुवारी, २०२५

लाइफस्टाइल
असे हे मारुती चितमपल्ली ..!
२० जून, २०२५

