मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

या फोटोत दिसणारे दोघेजण खरच भारतीय सैनिक आहेत की आणखी कोणी ? जाणून घ्या व्हायरल फोटो मागील सत्य !

2 मिनिट वाचन
शेअर करा:
या फोटोत दिसणारे दोघेजण खरच भारतीय सैनिक आहेत की आणखी कोणी ? जाणून घ्या व्हायरल फोटो मागील सत्य !

दिवस रात्र, चोवीस तास, बारा महिने, वर्षाचे ३६५ दिवस देशाचं संरक्षण करणाऱ्या भारतीय जवानांबद्दल आपल्या मनात आदर नक्कीच असला पाहिजे. त्यांच्या अभेद्य संरक्षणामुळेच आपण सुरक्षित आहोत. मंडळी, हा आदर वाढवणारी एक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. ऐन थंडीच्या दिवसात ही पोस्ट आली होती. एकीकडे आपण थंडीत कुडकुडत असताना भारतीय सैन्य मात्र बर्फाळ प्रदेशात खडा पहारा देत आहेत.

मंडळी, या पोस्टमध्ये २ भारतीय सैनिक सियाचीन सारख्या बर्फाळ प्रदेशात शून्यापेक्षाही कमी अशा -५० डिग्री सेल्सियस तापमानात झोपलेले दिसत आहेत. अशा भयंकर थंड तापमानात सामान्य माणूस राहूच शकणार नाही. पण हे भारतीय सैनिक आहेत राव. त्यांची जिद्द इथेच दिसून येते.

मंडळी, हा फोटो जरी अभिमानास्पद असला तरी दुर्दैवाने खोटा आहे. असं नाही की भारतीय सैन्य अशा तापमानात राहत नाही. पण हा जो फोटो आपल्याला दाखवण्यात येत आहे तो मात्र खोटा आहे. किरन खेर पासून श्रद्धा कपूरच्या फेसबुक पेज पर्यंत अनेक प्रसिद्ध सोशल मिडिया ग्रुप आणि पेजेसवर हा फोटो व्हायरल झाला होता.

...मग फोटो आहे तरी कोणाचा ?

मंडळी, एक मात्र खरं आहे की फोटोमध्ये दिसणारे हे दोघेही खरे सैनिक आहेत. पण ते भारतीय नसून रशियन आर्मीचे जवान आहेत. २०१३ मध्ये रशियन सैन्याच्या सैन्याभ्यासाच्या वेळी हा फोटो काढला होता. फोटोवरून देशाचा पत्ता लागत नसल्याने अनेकांचा यामुळे गोंधळ उडाला.

मंडळी, फक्त आपल्याच देशात नाही तर इतरही ठिकाणी अशाच गोष्टी व्हायरल होत असतात. आता हाच फोटो युक्रेनच्या सैनिकांचा आहे म्हणून युक्रेनमध्ये व्हायरल झाला आणि तिथे सुद्धा लोकांनी देशाभिमानी होऊन त्याला आणखी व्हायरल केलं. म्हणजेच युक्रेन असो वा भारत; घरोघरी मातीच्या चुली.

फॉरवर्ड झालेली गोष्ट खरी आहे हे समजून त्याला अजून पसरवणे किती चुकीचे आहे हे यावरूनच दिसते. मंडळी, देशाभिमान हा असलाच पाहिजे पण तो चुकीच्या गोष्टींमुळे नसावा एवढंच वाटतं. मंडळी हा फोटो तर खोटा होता पण आज आम्ही दाखवणार आहोत सियाचीनमधल्या भारतीय जवानांचे काही अस्सल फोटो ज्यामुळे तुमची मान खऱ्या अर्थाने उंचावेल!!

स्रोत

स्रोत

स्रोत

स्रोत

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलपाडल्या जाणाऱ्या इमारतीला ४३ मॉडेल्सच्या मदतीने अमर करणारे ऐतिहासिक छायाचित्र!छायाचित्रकार ऑर्मंड गिग्ली यांनी न्यूयॉर्कमधील पाडल्या जाणाऱ्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये ४३ महिलांना उभे करून काढलेल्या प्रसिद्ध फोटोची गोष्ट.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र
लाइफस्टाइल

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

१९९१ च्या गल्फ वॉरमध्ये जळालेल्या इराकी सैनिकाचे छायाचित्र घेणारे केनेथ जारेके आणि त्या एका फोटोने मांडलेले युद्धाचे विदारक वास्तव.

२४ ऑगस्ट, २०२६

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या
लाइफस्टाइल

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या

इन्स्टाग्रामवरील खोट्या माहितीवर आंधळा विश्वास ठेवून करोडपती होण्याच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलाची हत्या झाल्याची भोपाळमधील धक्कादायक घटना.

२० ऑगस्ट, २०२६

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'
लाइफस्टाइल

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या 'फेक' पॉझिटिव्हिटीच्या काळात वास्तवाचा सामना कसा करावा, याचे मार्गदर्शन.

३० मे, २०२६

'जगातील पहिली व्हायरल फेक न्यूज': एका पत्रकाराने रचलेला बाथटबचा बनावट इतिहास
लाइफस्टाइल

'जगातील पहिली व्हायरल फेक न्यूज': एका पत्रकाराने रचलेला बाथटबचा बनावट इतिहास

पत्रकार एच. एल. मेन्केन यांनी केवळ गंमत म्हणून लिहिलेला बाथटबचा खोटा इतिहास जगाने १०० वर्षे कसा खरा मानला, याची रंजक गोष्ट.

२० एप्रिल, २०२६

पुलित्झर जिंकणारी ती 'फेक न्यूज': जॅनेट कूक आणि वॉशिंग्टन पोस्टचा तो धक्कादायक किस्सा
लाइफस्टाइल

पुलित्झर जिंकणारी ती 'फेक न्यूज': जॅनेट कूक आणि वॉशिंग्टन पोस्टचा तो धक्कादायक किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार जॅनेट कूक यांनी लिहिलेली 'जीमी'ची हृदयद्रावक कथा कशी खोटी ठरली आणि त्यांना पुलित्झर पुरस्कार परत करावा लागला, याची ही गोष्ट.

१६ एप्रिल, २०२६