मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा
📖मालिका: व्हॅक्सिन्सचा इतिहासभाग 1/11 ›

व्हॅक्सिनमुळे जीवावर बेतण्यापासून ते अनेक मुलांना जीवनदान मिळेपर्यंत....हा आहे डांग्या खोकल्याच्या व्हॅक्सिनचा इतिहास!!

3 मिनिट वाचन
शेअर करा:
व्हॅक्सिनमुळे जीवावर बेतण्यापासून ते अनेक मुलांना जीवनदान मिळेपर्यंत....हा आहे डांग्या खोकल्याच्या व्हॅक्सिनचा इतिहास!!

आज कोविडमुळे अख्खी दुनिया भरडून निघालेली असताना ज्याच्या त्याच्या तोंडी व्हॅक्सिनचा विषय आहे. नित्य व्यवहार कधी सुरळीत सुरू होणार? लॉकडाऊनची टांगती तलवार कधी दूर होणार? हे सगळ्यांसाठी कळीचे प्रश्न आहेत. बहुतेक संशोधकांच्या मते किमान ७० ते ७५ टक्के लोकांचं व्हॅक्सिनेशन पूर्ण झाल्यावरच या साथीला काही प्रमाणात आळा बसू शकेल आणि त्यासाठी अजून काही वेळ जावा लागेल. पण अशा प्रकारे जगाला वेठीला धरणारा कोविड हा काही पहिलाच रोग नाही. जगाच्या इतिहासात याहून भयंकर अशा रोगांच्या साथी येऊन गेल्या आहेत. डांग्या खोकला किंवा व्हूपिंग कफ हा असाच एक रोग.

डांग्या खोकल्याला आजार म्हणून ओळख मिळाली ती मध्ययुगापासून. हा आजार प्रामुख्याने नवजात अर्भकं व लहान मुलांमध्ये दिसतो. क्वचित प्रसंगी तरुण आणि मोठ्या माणसांमध्ये आढळतो. सुरुवातीला त्याची लक्षणं बरीचशी सर्दीसारखी असली तरीही नंतर धाप लागून खोकल्याची उबळ येते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुलांमध्ये ह्या आजारामुळे असणारा मृत्युदर १० % एवढा जास्त होता.

व्हॅक्सिनमुळे जीवावर बेतण्यापासून ते अनेक मुलांना जीवनदान मिळेपर्यंत....हा आहे डांग्या खोकल्याच्या व्हॅक्सिनचा इतिहास!! – चित्र 1

या रोगावर व्हॅक्सिन शोधण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले. १९०६ मध्ये बोर्डटेला पर्टोसिस नावाचा जीवाणू या रोगासाठी कारणीभूत आहे याचा शोध लागला आणि त्यावरची लस विकसित करण्यात आली. मात्र ती इतकी प्रभावी नव्हती. १९३९ मध्ये या रोगावर प्रभावी लस शोधून काढली गेली. पर्ल केनड्रीक, ग्रेस एल्डरींग, आणि लोनी गॉर्डन या संशोधकांचे यासाठी आभार मानायला हवेत. हे होतं होल सेल इनॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन, म्हणजे मृत जीवाणूपासून बनवलेलं. १९४० च्या उत्तरार्धात पर्टोसिस लसीला डिफथेरिया आणि टिटॅनस टॉक्साइड म्हणजे घटसर्प आणि धनुर्वात यांच्या लसीसोबत जोडलं गेलं. ट्रिपल व्हॅक्सिन किंवा डीटीपी म्हणून साऱ्या जगात ओळखलं जातं ते हेच.

१९८० च्या सुरुवातीपर्यंत पर्टोसिस व्हॅक्सिनमुळे डांग्या खोकल्याच्या अमेरिकेतील केसेसची संख्या लक्षणीय प्रमाणात - म्हणजे तब्बल दीडशे पटीने - कमी झाली. पण कुठल्याही चांगल्या गोष्टीला दुर्दैवाच्या फेऱ्यातून जावं लागावं तसं याही बाबतीत घडलं. लोकांना व्हॅक्सिनच्या साईड इफेक्ट्सची भीती वाटायला लागली. वास्तविक साईड इफेक्ट्स हे प्रत्येक औषधाच्या जोडीने येतातच आणि ते कालांतराने नाहीसेही होतात. पण ह्या व्हॅक्सिनचे दुष्परिणाम दुर्मिळ असले तरी दुर्लक्ष करण्याइतके सहजसोपे निश्चितच नव्हते. ह्या व्हॅक्सिनमुळे नेहमीच्या साईड इफेक्टस व्यतिरिक्त काही न्युरोलॉजिकल समस्या निर्माण झाल्याचा दावा काहीजण करतात. या व्हॅक्सिनमुळे मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर परिणाम झाल्याचं एका टिव्ही डॉक्युमेंटरीमध्ये दाखवलं गेलं. याचा परिणाम असा झाला, की अनेकांनी त्यांच्या मुलांना हे व्हॅक्सिन देण्यास नकार दिला.

व्हॅक्सिनमुळे जीवावर बेतण्यापासून ते अनेक मुलांना जीवनदान मिळेपर्यंत....हा आहे डांग्या खोकल्याच्या व्हॅक्सिनचा इतिहास!! – चित्र 2

दरम्यान व्हॅक्सिनच्या दुष्परिणामावर उपाय शोधण्याचा प्रयत्न युजी सातो या जपानी संशोधकाने केला. हा मनुष्य असेल्युलर व्हॅक्सिन वर काम करत होता. असेल्युलर म्हणजे ज्यात प्रत्यक्ष पेशी न वापरता केवळ अँटीजेन किंवा रोग निर्माण करणाऱ्या पदार्थाचा (जे केमिकल, टॉक्सिन, जिवाणू, विषाणू किंवा इतर फॉरेन मटेरियल असू शकतं) मॉलेक्यूल वापरतात असं व्हॅक्सिन. १९७४ साल येईपर्यंत त्यांनी पर्टोसिस टॉक्सिन (PT) व फिलामेंटस हिमाग्लुटिनिन (FHA) हे दोन अँटीजेन असलेल्या व्हॅक्सिनची निर्मिती सुरू केली. १९८१ मध्ये या परिणामकारक व्हॅक्सिनला जपानमध्ये वापरासाठी हिरवा कंदील दाखवला गेला. हळूहळू का होईना पण साऱ्या जगाने ह्या व्हॅक्सिन डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या पद्धती स्विकारल्या.

एकूण सगळं बघता या व्हॅक्सिनच्या शोधापासून ते स्वीकृतीपर्यंतचा सगळाच प्रवास रोमहर्षक असाच आहे. नाही का?

व्हॅक्सिन्सचा इतिहास · भाग 1/11
पुढचा भाग 2पिसाळलेल्या कुत्र्याच्या जबड्यात हात घालणाऱ्या लुई पाश्चरने रेबीजवर लस कशी शोधली??→

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख

कल्हणकृत राजतरंगिणी आणि काश्मीरच्या राजांचा रंजक प्राचीन इतिहास
लाइफस्टाइल

कल्हणकृत राजतरंगिणी आणि काश्मीरच्या राजांचा रंजक प्राचीन इतिहास

कल्हण पंडितांच्या राजतरंगिणी ग्रंथाच्या आधारे काश्मीरचा प्राचीन इतिहास आणि कर्कोटक वंशातील राजांच्या कारभाराचा रंजक वेध.

२ जून, २०२६

बायकांच्या 'ब्रा'चा रंजक इतिहास: दोन रुमालांपासून सुरू झालेला अब्जावधींचा जागतिक व्यापार!
लाइफस्टाइल

बायकांच्या 'ब्रा'चा रंजक इतिहास: दोन रुमालांपासून सुरू झालेला अब्जावधींचा जागतिक व्यापार!

दोन रेशमी रुमालांपासून सुरू झालेला 'ब्रा'चा प्रवास आणि त्याचा जागतिक फॅशन व व्यापारावर झालेला परिणाम सांगणारा रंजक इतिहास.

३० मे, २०२६

'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ज्युडास आणि विश्वासघाताची गोष्ट
लाइफस्टाइल

'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ज्युडास आणि विश्वासघाताची गोष्ट

बायबलमधील ज्युडास आणि कत्तलखान्यातील 'ज्युडास गोट' यांच्यातील साम्य सांगणारी ही गोष्ट आपल्याला विश्वासघाताची नवी व्याख्या शिकवते.

२४ मार्च, २०२६

स्टेटस सिंबल ते 'सायलेंट किलर': गुटक्याचा रक्ताळलेला इतिहास
लाइफस्टाइल

स्टेटस सिंबल ते 'सायलेंट किलर': गुटक्याचा रक्ताळलेला इतिहास

एकेकाळी श्रीमंतीचे लक्षण मानल्या जाणाऱ्या पानपराग आणि माणिकचंद गुटक्याचा रक्ताळलेला इतिहास आणि त्याचा सामाजिक आरोग्यावर झालेला परिणाम.

२३ मार्च, २०२६

सुपर मार्केटमधील 'शॉपिंग कार्ट'चा रंजक इतिहास आणि एका जिद्दी माणसाची गोष्ट
लाइफस्टाइल

सुपर मार्केटमधील 'शॉपिंग कार्ट'चा रंजक इतिहास आणि एका जिद्दी माणसाची गोष्ट

आज आपण सहज वापरत असलेल्या शॉपिंग कार्टला सुरुवातीला ग्राहकांनी नाकारले होते. सिल्व्हान गोल्डमन यांनी लावलेल्या या शोधाची ही रंजक गोष्ट.

२० मार्च, २०२६