मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ज्युडास आणि विश्वासघाताची गोष्ट

4 मिनिट वाचन

बायबलमधील ज्युडास आणि कत्तलखान्यातील 'ज्युडास गोट' यांच्यातील साम्य सांगणारी ही गोष्ट आपल्याला विश्वासघाताची नवी व्याख्या शिकवते.

शेअर करा:
'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ज्युडास आणि विश्वासघाताची गोष्ट

'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ! ज्युडास-येशू ख्रिस्ताचा सर्वात जवळचा शिष्य,जो त्यांच्या गटाचा खजिनदार होता,त्याने केवळ ३० चांदीच्या शिक्क्यांसाठी आपल्या गुरुचा सौदा केला होता.

ज्युडास इस्कॅरिओट,हे नाव आजही जगात विश्वासघाताचं सर्वात मोठं प्रतीक मानलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, की ज्युडासची ही गोष्ट फक्त दोन हजार वर्षांपूर्वीच्या बायबलपुरती मर्यादित नाही? आजही आपल्या आसपास अनेक 'ज्युडास' वावरत असतात आणि त्यांना ओळखण्यासाठी 'ज्युडास गोट' (Judas Goat) ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे.

ज्युडास हा येशूच्या १२ शिष्यांपैकी एकमेव असा होता जो गॅलीलीचा नव्हता.तो जुडियामधील 'केरिओथ' गावचा होता. कदाचित म्हणूनच तो इतर शिष्यांपेक्षा स्वतःला वेगळा आणि थोडा जास्त हुशार समजत असावा.त्याच्याकडे गटाचे पैसे सांभाळण्याची जबाबदारी होती. पण पैशांचा हा मोहच शेवटी त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला.

त्याने येशूला पकडून देण्यासाठी मुख्य धर्मगुरूंशी करार केला,३० चांदीची नाणी! आजच्या हिशोबात ही रक्कम फार मोठी नसेल, पण त्या काळात एका गुलामाची हीच किंमत असायची.पण ज्युडासने हे का केलं? काही लोक म्हणतात तो लोभी होता, जेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली, तेव्हा तो पश्चातापाने जळून गेला. त्याने ती नाणी परत केली आणि शेवटी आत्महत्या केली.

आता इथे एक ट्विस्ट आहे. याच ज्युडासच्या नावावरून 'ज्युडास गोट' ही संज्ञा आली आहे. कत्तलखान्यांमध्ये किंवा जिथे मेंढ्यांचे कळप पाळले जातात, तिथे एका खास बोकडाला प्रशिक्षण दिलं जातं.यालाच 'ज्युडास गोट' म्हणतात. त्याचं काम काय असतं? तर मेंढ्यांच्या मोठ्या कळपाला विश्वासात घेऊन त्यांना कत्तलखान्याच्या दिशेने घेऊन जाणं.

मेंढ्यांना वाटतं की हा आपलाच एक सोबती आहे, तो आपल्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातोय.तो बोकड मोठ्या दिमाखात कळपाच्या पुढे चालतो.मेंढ्या डोळे झाकून त्याच्या मागे जातात. कत्तलखान्याच्या दारापर्यंत पोहोचल्यावर, हा 'ज्युडास गोट' एका बाजूच्या छोट्या दरवाजातून शांतपणे निसटतो आणि मागे राहिलेल्या सर्व मेंढ्या मृत्यूच्या सापळ्यात अडकतात.

मजा बघा, या कामाच्या बदल्यात त्या बोकडाला काय मिळतं? जुन्या काळात शिकागोच्या मोठ्या कत्तलखान्यांमध्ये या ज्युडास गोटला बक्षीस म्हणून चक्क सिगारेट खायला दिली जायची! हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. त्या बोकडांना निकोटीनचं व्यसन लावलं जायचं, जेणेकरून ते पुन्हा पुन्हा मेंढ्यांना मृत्यूच्या दारात सोडून येतील आणि आपली 'मजुरी' वसूल करतील.

आज मार्च २०२६ मध्ये जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की ही पद्धत अजूनही संपलेली नाही. आजही अनेक ठिकाणी 'ज्युडास गोट' वापरले जातात.

आपल्या खऱ्या आयुष्यातही असे अनेक 'ज्युडास गोट' असतात. ते तुमच्यात मिसळतात, तुमचे मित्र बनतात, तुमच्या फायद्याच्या गोष्टी करतात असं भासवतात. पण प्रत्यक्षात ते तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन सोडतात जिथे तुमचं नुकसान अटळ असतं आणि ते स्वतः मात्र सुरक्षितपणे बाहेर पडतात. मग ते कॉर्पोरेट ऑफिस असो, राजकारण असो किंवा तुमचं वैयक्तिक आयुष्य. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला अचानक खूप मोठे स्वप्न दाखवू लागते किंवा विनाकारण तुमच्या जवळ येते, तेव्हा एकदा नक्की तपासा की तो तुम्हाला हिरव्या कुरणाकडे नेतोय की कत्तलखान्याकडे. ज्युडास आजही कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या आसपास फिरत असतो.

आपला नेता किंवा मार्गदर्शक निवडताना डोळे उघडे ठेवा, कारण कळपाच्या पुढे चालणारा प्रत्येकजण तुम्हाला सुरक्षित ठिकाणीच नेईल याची खात्री नसते. लक्षात ठेवा

चाँदी के चंद टुकड़ों के लिए

ईमान को बेचा जात है

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

बायकांच्या 'ब्रा'चा रंजक इतिहास: दोन रुमालांपासून सुरू झालेला अब्जावधींचा जागतिक व्यापार!
लाइफस्टाइल

बायकांच्या 'ब्रा'चा रंजक इतिहास: दोन रुमालांपासून सुरू झालेला अब्जावधींचा जागतिक व्यापार!

दोन रेशमी रुमालांपासून सुरू झालेला 'ब्रा'चा प्रवास आणि त्याचा जागतिक फॅशन व व्यापारावर झालेला परिणाम सांगणारा रंजक इतिहास.

३० मे, २०२६

सुपर मार्केटमधील 'शॉपिंग कार्ट'चा रंजक इतिहास आणि एका जिद्दी माणसाची गोष्ट
लाइफस्टाइल

सुपर मार्केटमधील 'शॉपिंग कार्ट'चा रंजक इतिहास आणि एका जिद्दी माणसाची गोष्ट

आज आपण सहज वापरत असलेल्या शॉपिंग कार्टला सुरुवातीला ग्राहकांनी नाकारले होते. सिल्व्हान गोल्डमन यांनी लावलेल्या या शोधाची ही रंजक गोष्ट.

२० मार्च, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र
लाइफस्टाइल

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

१९९१ च्या गल्फ वॉरमध्ये जळालेल्या इराकी सैनिकाचे छायाचित्र घेणारे केनेथ जारेके आणि त्या एका फोटोने मांडलेले युद्धाचे विदारक वास्तव.

२४ ऑगस्ट, २०२६