मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

सुपर मार्केटमधील 'शॉपिंग कार्ट'चा रंजक इतिहास आणि एका जिद्दी माणसाची गोष्ट

2 मिनिट वाचन

आज आपण सहज वापरत असलेल्या शॉपिंग कार्टला सुरुवातीला ग्राहकांनी नाकारले होते. सिल्व्हान गोल्डमन यांनी लावलेल्या या शोधाची ही रंजक गोष्ट.

शेअर करा:
सुपर मार्केटमधील 'शॉपिंग कार्ट'चा रंजक इतिहास आणि एका जिद्दी माणसाची गोष्ट

आता आपण कोणत्याही मोठ्या सुपर मार्केटमध्ये जातो.त्या दुकानाच्या दाराशीच शॉपिंग कार्टची रांग उभी असते.एकदा ती ढकलगाडी हातात आली की आपले शॉपिंग सुरु होते.हातात वजन नसल्यामुळे खरेदी करणे सोपे होते आणि खरेदीही जास्त होते.पण खरेदीची ही सोय म्हणजे शॉपिंग कार्ट जेव्हा १९३७ साली ओल्क्लाहोमाच्या हंप्टी डंप्टी सुपर मार्केटने आणली तेव्हा ग्राहकांनी ती कार्ट वापरायला चक्क नकारच दिला होता.तुमच्या मनात 'का'? हा प्रश्न उभा असेलच. तर आता वाचा डिटेलवारी स्टोरी !!!!

शॉपिंग कार्टची आयडिया सिल्व्हान नाथन गोल्डमन या माणसाची.पहिल्या महायुध्दानंतर बरीच वर्षं सिल्व्हान फळफळावळ पुरवठेदार म्हणून भावासोबत काम करायचा.याच दरम्यान दुकांनाचा आकार वाढत गेला सुपर मार्केट किंवा 'सगळं काही एकाच दुकानात' ही कल्पना पुढे आली. सिल्व्हानने 'हंप्टी-डंप्टी' नावाचं एक सुपर मार्केट विकत घेतलं. त्या काळात किराणा आणि घरी लागणार्‍या सर्व वस्तूंच्या खरेदीची जबाबदारी महिलांकडेच असायची.दुकानात येणारे ग्राहक हातात मोठ्या पिशव्या घेऊन खरेदी करायचे. त्या पिशव्या भयंकर जड व्हायच्या. महिलांची तर फारच पंचाईत व्हायची कारण दुकानाचा विस्तार वाढलेला असल्याने एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जड पिशव्या घेऊन फिरताना त्यांची दमछाक व्हायची.

मग एक दिवस सिल्व्हानच्या डोक्यात एक कल्पना आली.त्याने लहान बाळांना फिरायला घेऊन जायच्या बाबागाडीचे रुपांतर शॉपींग कार्ट मध्ये केले.पण तेही पसंत न आल्याने त्यानेफोल्डिंग खुर्चीचे डिझाईन डोक्यात ठेवून दोन खण असलेली पहिली शॉपींग कार्ट बनवली.त्यात काही बदल करून एक फायनल डिझाईन बनवले. Folding Basket Carrier Co नावाची कंपनी स्थापन केली आणि या डिझाईनचे पेटंट घेतले.

शॉपिंग कार्ट तयार झाल्या पण त्याच्या मार्केटमध्ये कोणीच ती कार्ट वापरेना. महिलांना ती बाबागाडी ढकलण्याचा फील यायचा आणि पुरुषांना गाडी ढकलण्यात कमीपणा वाटायचा. पण शॉपिंग कार्ट वापरण्यात असलेली सोय कोणाच्याही लक्षात येईना. सिल्वानने मग आणखी एक शक्कल लढवली. त्यानी वेगवेगळ्या वयाच्या स्त्री पुरुषांना नोकरीत घेतलं. दुकानात ग्राहक असल्याची बतावणी करून हे नोकर शॉपिंग कार्ट घेऊन फिरायचे. त्यांच्याकडे बघून ग्राहकांना शॉपिंग कार्ट कशी सोयिस्कर आहे ते कळलं आणि त्याचा वापर सर्रास सुरु झाला.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

बायकांच्या 'ब्रा'चा रंजक इतिहास: दोन रुमालांपासून सुरू झालेला अब्जावधींचा जागतिक व्यापार!
लाइफस्टाइल

बायकांच्या 'ब्रा'चा रंजक इतिहास: दोन रुमालांपासून सुरू झालेला अब्जावधींचा जागतिक व्यापार!

दोन रेशमी रुमालांपासून सुरू झालेला 'ब्रा'चा प्रवास आणि त्याचा जागतिक फॅशन व व्यापारावर झालेला परिणाम सांगणारा रंजक इतिहास.

३० मे, २०२६

'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ज्युडास आणि विश्वासघाताची गोष्ट
लाइफस्टाइल

'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ज्युडास आणि विश्वासघाताची गोष्ट

बायबलमधील ज्युडास आणि कत्तलखान्यातील 'ज्युडास गोट' यांच्यातील साम्य सांगणारी ही गोष्ट आपल्याला विश्वासघाताची नवी व्याख्या शिकवते.

२४ मार्च, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र
लाइफस्टाइल

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

१९९१ च्या गल्फ वॉरमध्ये जळालेल्या इराकी सैनिकाचे छायाचित्र घेणारे केनेथ जारेके आणि त्या एका फोटोने मांडलेले युद्धाचे विदारक वास्तव.

२४ ऑगस्ट, २०२६