मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अमेरिकेतून नेपाळला परतणार १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे दुर्मिळ शिल्प

2 मिनिट वाचन

नेपाळमधून तस्करी करून अमेरिकेत नेलेले १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे ऐतिहासिक शिल्प आता पुन्हा मायदेशी परतणार आहे.

शेअर करा:
अमेरिकेतून नेपाळला परतणार १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे दुर्मिळ शिल्प

१२ व्या शतकातील गौतम बुध्दांचे हे शिल्प आतापर्यंत अमेरिकेतील आर्ट सोसायटी ऑफ शिकागोच्या संग्रहात होते.काही दिवसांपूर्वी हे शिल्प तस्करीच्या- चोरीच्या मार्गाने नेपाळमधून अमेरिकेत आले आहे हे समजल्यावर या सोसायटीने हे शिल्प नेपाळ सरकारकडे परत पाठवण्याचा निर्णय स्वतःच घेतला आहे.या शिल्पात चित्रित झालेली कहाणी अशी आहे.

' भगवान गौतम बुध्द ध्यानस्थ रुपात एका सर्पाच्या वेटोळ्यावर स्थानापन्न असल्याचे दिसते आहे.हा सर्प म्हणजे मुचिलिन्द नाग - या नागाचा उल्लेख बौध्द ग्रंथात मुचिलिन्द सूत्त या प्रकरणात आढळतो.गौतम बुध्दांनी बोधी वृक्षाखाली तपाला आरंभ केल्यानंतर आकाश सात दिवस काळवंडले आणि विलक्षण जोराचा पाऊस सुरु झाला.अशा वेळी मुचिलिन्द पाताळातून बाहेर आला.त्याच्या वेटोळ्यांनी आणि फण्यानी गौतमबुध्दाचे या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण केले.जेव्हा वादळ संपले तेव्हा मुचिलिन्द मनुष्य स्वरुपात प्रकट झाला.त्याने गौतम बुध्दांना प्रणाम करून आपल्या स्वस्थानी रवाना झाला'

अशी अनेक मुचिलिन्द असलेली शिल्पे आजही वेगवेगळ्या लेण्यांमध्ये बघायला मिळतात.

वर उल्लेख केले शिल्प सोसायटीच्या आर्ट गॅलरीत १९९७ सालापासून प्रदर्शित करण्यात आले होते. मेरिलीन आल्स्डॉर्फ नावाच्या एका कला संग्राहक महिलेने हे शिल्प या सोसायटीला भेत म्हणून दिले होते.सोबतच या महिलेच्या पतीने म्हणजे जेम्स आल्स्डॉर्फने जगभरातून गोळा केलेल्या १०० हून अधिक कलाकृती शिकागो आर्ट गॅलरीला भेट म्हणून दिल्या होत्या. गेल्या काही वर्षात जगातील बहुतेक आर्ट गॅलरींनी त्यांना आलेल्या भेटवस्तूंचा 'सोर्स' निश्चित करण्याची सुरुवात केली आहे. त्यानुसार आल्स्डॉर्फ दांपत्याने दिलेल्या सर्व कलाकृतींचा मागोवा घेण्यात आला आणि असे लक्षात आले की त्यापैकी २४ कलाकृती तस्करीच्या मार्गाने वेगवेगळ्या देशातून अमेरिकेत आल्या आहेत.

वर उल्लेख केलेले शिल्प खाटमांडू जवळील गिता बाही या भागातून चोरी झाले होते हे नक्की झाल्यावर आता हे शिल्प पुन्हा एकदा नेपाळ देशाल मिळणार आहे. आपण आशा करूया की आपल्या देशातून तस्करी झालेली शिल्पेही अशीच परत येतील

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'काला नमक' म्हणजे मीठ नाही, तर बुद्धांचा 'प्रसाद'; सुगंधी तांदळाची गोष्ट
लाइफस्टाइल

'काला नमक' म्हणजे मीठ नाही, तर बुद्धांचा 'प्रसाद'; सुगंधी तांदळाची गोष्ट

अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेला आणि बुद्धांचा प्रसाद मानला जाणारा उत्तर प्रदेशातील सुगंधी 'काला नमक' तांदूळ.

२५ मे, २०२६

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?
लाइफस्टाइल

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?

भारतीयांच्या सोन्यावर बंदी घालणाऱ्या १९६८ च्या गोल्ड कंट्रोल ॲक्टचा अजब इतिहास आणि त्यामुळे सुरू झालेली तस्करी.

१७ ऑगस्ट, २०२६

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ
लाइफस्टाइल

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

१९५७ मध्ये व्हिक्टोरिया डॉकवर ३०० तोळे सोन्याची तस्करी पकडणारे मुंबई कस्टम्सचे कर्तव्यदक्ष अधिकारी बापू लक्ष्मण लामखडे यांची शौर्यकथा.

२ जुलै, २०२६

एव्हरेस्टच्या शिखरावर १६५ कोटींचा विमा घोटाळा: बेकिंग सोड्याचं 'पांढरं' कारस्थान
लाइफस्टाइल

एव्हरेस्टच्या शिखरावर १६५ कोटींचा विमा घोटाळा: बेकिंग सोड्याचं 'पांढरं' कारस्थान

नेपाळमध्ये गिर्यारोहकांच्या जेवणात बेकिंग सोडा मिसळून त्यांना आजारी पाडलं जायचं आणि विमा कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये उकळले जायचे.

४ एप्रिल, २०२६

खवले मांजर: तस्करीच्या सापळ्यात अडकलेला एक 'लाजाळू' सेलिब्रिटी!
विज्ञान

खवले मांजर: तस्करीच्या सापळ्यात अडकलेला एक 'लाजाळू' सेलिब्रिटी!

अंधश्रद्धेमुळे खवले मांजराची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे. या निष्पाप प्राण्याला वाचवण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.

१६ फेब्रुवारी, २०२६