मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

या हिरोला वळखलं का ? सांगा बरं कोण ह्यो !!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
या हिरोला वळखलं का ? सांगा बरं कोण ह्यो !!!

एकदम जबरी, खतरनाक लुक दिसतोय ना भावा? अमिताभ बच्चनचा ‘पा’ बघितला, रजनीकांतचा रोबॉट बघितला, ऋषी कपूरचा ‘कपूर अॅण्ड सन्स’ बघितला.. पन असला भारी लुक नाय बघितला राव. वळखूच येईना झालाय हा तर....

लय इचार केल्यानंतर समजलं मला. हा तर आपला ‘राजकुमार राव’.

 

मायला...’राबता’ शिनेमासाठी त्यानं हे असलं लुक करून घेतलाय. काय आहे ना, राजकुमार राव या शिनेमात ३२४ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या रोलमध्ये हाय. आता तुम्ही म्हनाल या शिनेमात सुशांत सिंग राजपूत आन ‘क्रिती सनॉन’ हायत पन राजकुमार राव दिसला नाय गड्या.

आरं बाबा, म्हणून सांगतो ट्रेलर मध्ये फकस्त हिरोईनी बघायच्या नसत्यात. ट्रेलरमध्ये शेवटी एक म्हातारा दिसतोय बघ, अंगावर टाटू केलेला..  तोच हाय राजकुमार राव. कोनाच्या बाला पन वळखू येईना झालाय तो...

आता परत ट्रेलर उघडा आन राजकुमार राव दिसतोय का ते बघा... !!!

संबंधित लेख