मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

१८५५ चा तो 'हूल': १८५७ च्या स्वातंत्र्यसमराआधी आदिवासींचा ब्रिटिशांविरुद्ध लढा!

2 मिनिट वाचन

१८५७ च्या उठावाच्या दोन वर्षे आधी सिधू आणि कान्हू मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली संथाल आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेला ऐतिहासिक लढा.

शेअर करा:
१८५५ चा तो 'हूल': १८५७ च्या स्वातंत्र्यसमराआधी आदिवासींचा ब्रिटिशांविरुद्ध लढा!

१८५५ चा तो 'हूल':१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या बरोबर दोन वर्ष आधी संथाल आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध युद्धाचं रणशिंग फुंकलं होतं !!

आज ३० जून, म्हणजेच 'हूल दिवस'. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या बरोबर दोन वर्ष आधी, सिधू आणि कान्हू मुर्मू या दोन भावांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्धाचं रणशिंग फुंकलं होतं.यंदा या क्रांतीचं १७१ वं वर्ष आहे.

३० जून १८५५ रोजी याच भोगनाडीहमध्ये १०,००० पेक्षा जास्त संथाल आदिवासी एकत्र आले होते. सिधू, कान्हू, चांद आणि भैरव या चार भावांनी 'दिक्कू' (बाहेरचे शोषक) आणि ब्रिटिशांना हाकलून लावण्याची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या बहिणी, फुलो आणि झानो मुर्मू यांनी महिलांची तुकडी लढवली होती. हा लढा इतका भीषण होता की, ब्रिटिशांना चक्क मार्शल लॉ लागू करावा लागला होता.

त्या काळात जवळपास १५,००० आदिवासींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ब्रिटिशांनी युद्धात हत्तींचा वापर करून आदिवासींची गावं उद्ध्वस्त केली होती. तरीही आदिवासी मागे हटले नाहीत. अखेर ब्रिटिशांना झुकून 'संथाल परगणा' हा स्वतंत्र प्रशासकीय विभाग बनवावा लागला. आजही 'संथाल परगणा टेनन्सी ॲक्ट' (SPT Act) हा तिथल्या जमिनींच्या संरक्षणासाठी सर्वात महत्त्वाचा कायदा मानला जातो.

खुद्द कार्ल मार्क्सनेही आपल्या 'नोट्स ऑन इंडियन हिस्ट्री'मध्ये या संथाल विद्रोहाची दखल घेतली होती, हे विशेष.

संथाल हूल हा शोषणाविरुद्धचा जागतिक हुंकार आहे. आज जेव्हा जमिनीचे हक्क आणि कॉर्पोरेट घुसखोरी यावर चर्चा होते, तेव्हा १८५५ सालचा तो संघर्ष पुन्हा जिवंत होतो.

इतिहासाची पानं उलटताना एक गोष्ट स्पष्ट होते की, सत्ता कोणाचीही असो, आदिवासी अस्मितेचा हा 'हूल' आजही तितकाच धगधगता आहे.केवळ पुतळ्यांना हार घालून हा वारसा जपला जाईल की खऱ्या अर्थाने जल-जंगल-जमीन सुरक्षित राहील, हाच खरा प्रश्न आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

हुंडा सगळ्यांना नको होता... तरीही मुली मरत राहिल्या
लाइफस्टाइल

हुंडा सगळ्यांना नको होता... तरीही मुली मरत राहिल्या

१९६१ चा हुंडाबंदी कायदा आणि १९८५ ची सुधारणा असूनही हुंडाबळी का थांबत नाहीत? समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवणारा लेख.

२ ऑक्टोबर, २०२६

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!
लाइफस्टाइल

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!

विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.

१३ ऑक्टोबर, २०२६