मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

या दोघांनी आपल्या मुलांबरोबर जे केलं ते बघून विश्वास बसणार नाही !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
या दोघांनी आपल्या मुलांबरोबर जे केलं ते बघून विश्वास बसणार नाही !!

मानसिक स्वास्थ्य बिघडलेली माणसं कोणत्या थरला जाऊ शकतात याचं एक उदाहरण बघा राव. कॅलिफोर्निया इथल्या एका जोडप्यांने आपल्या १३ मुलांना घरात डांबून ठेवलं होतं. त्यांना जेव्हा सोडवण्यात आलं तेव्हा ती सगळी मुलं कुपोषित झाली होती.

डेव्हिड तुर्पिन (५७) आणि लुईस तुर्पिन (४९) हे कॅलिफोर्निया मध्ये राहतात. त्यांच्या राहत्या घरातून एक मुलगी रविवारी गुपचूप पळाली आणि तिने पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घरात चाललेला अघोरी प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी त्या घरावर छापा मारून १२ मुलांना तिथून सोडवलं आणि या नवरा बायकोच्या जोडीला बेड्या ठोकल्या. यावेळी त्या मुलांची स्थिती अत्यंत वाईट होती. दुर्गंधीने भरलेल्या घरात त्यांना साखळीने बांधण्यात आलं होतं. 

स्रोत

स्थानिक रिपोर्टनुसार या सर्व मुलांना मारहाण करून अन्न पाण्याविना ठेवण्यात आलं होतं. यातील २९ वर्षाच्या एका मुलीचं वजन तब्बल ३७ किलो राहिलं आहे. हे जोडपं मुलांना साखळदंडाला बांधून त्यांच्यासमोर खाण्यापिण्याचे पदार्थ ठेवायचे. पोटात भूक असूनही त्यांना ते खाता यायचं नाही. काही वेळा त्यांना बांधून न ठेवता रूम मध्ये बंद करण्यात यायचं. त्यांना खेळायची, अंघोळ करायची परवानगी नव्हती. याशिवाय त्यांच्यातील सर्वात मोठ्या मुली बरोबर डेव्हिड तुर्पिन ने लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे.

हे सर्व अनेक वर्षांपासून सुरु होतं. पण एवढं सगळं शेजारी सुरु असताना कोणाचच तिकडे लक्ष गेलं नाही हे काही पटत नाही ब्वा !!

या जोडप्याने स्वतःच्या पोटच्या मुलांवर असे अत्याचार का केले याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलकोठडीतील मृत्यू: जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा...ओडिसातील सुमन बेहराच्या कोठडीतील मृत्यूने भारतीय न्यायव्यवस्थेत कसा बदल घडवला? एका माऊलीने व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची ही सत्यकथा.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

बँक घोटाळे नेमके कसे होतात? एका सत्य घटनेमागची चक्रावून टाकणारी कहाणी!
लाइफस्टाइल

बँक घोटाळे नेमके कसे होतात? एका सत्य घटनेमागची चक्रावून टाकणारी कहाणी!

बँकांमधील करोडो रुपयांचे घोटाळे नेमके कसे घडतात आणि तपासात काय समोर येते, याचा उलगडा करणारी ही रंजक कहाणी.

३० जुलै, २०२६

जगातल्या प्रत्येक अ‍ॅव्होकॅडोमागे दडलेली आहे एका पोस्टमनची १०० वर्ष जुनी गोष्ट!
लाइफस्टाइल

जगातल्या प्रत्येक अ‍ॅव्होकॅडोमागे दडलेली आहे एका पोस्टमनची १०० वर्ष जुनी गोष्ट!

आज जगभरात खाल्ल्या जाणाऱ्या ८०% हून अधिक हास अ‍ॅव्होकॅडोचा शोध रुडॉल्फ हास नावाच्या साध्या पोस्टमनने कसा लावला?

२० जून, २०२६

जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ श्वास घेणं नव्हे; ओल्गा टेलिस खटल्याने बदलला भारताचा चेहरा!
लाइफस्टाइल

जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ श्वास घेणं नव्हे; ओल्गा टेलिस खटल्याने बदलला भारताचा चेहरा!

मुंबईतील फूटपाथवर राहणाऱ्यांच्या हक्कासाठी लढलेल्या ओल्गा टेलिस खटल्याने भारतीय न्यायव्यवस्थेत 'जगण्याच्या अधिकारा'ची नवी व्याख्या कशी मांडली?

२ एप्रिल, २०२६