मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

गर्भवती हत्तीणीसोबत असं करणाऱ्यांना उलटं टांगून मिरचीची धुरी द्यायला हवी !!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
गर्भवती हत्तीणीसोबत असं करणाऱ्यांना उलटं टांगून मिरचीची धुरी द्यायला हवी !!

देशभरात माणुसकीचे दर्शन घडत असताना माणुसकीचाच एक क्रूर चेहरा पुढे आला आहे. केरळमध्ये एक घटना घडली आहे. तिथल्या काही स्थानिकांनी एका गर्भवती हत्तीणीला अननसमध्ये फटाके भरून खाऊ घातले. यात तिचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. वन विभागातील काही अधिकाऱ्यांनी हा फोटो सोशल मीडियावर टाकला आणि तो वायरल व्हायला वेळ लागला नाही. हा फोटो बघून लोकांच्या संतापाचा बांध फुटला.

गर्भवती हत्तीणीसोबत असं करणाऱ्यांना उलटं टांगून मिरचीची धुरी द्यायला हवी !! – चित्र 1

ही घटना केरळमधील मलप्पूरम येथील आहे. एक भुकेली गर्भवती हत्तीण अन्नाच्या शोधात भटकत होती. तिच्या या परिस्थितीचा फायदा काही लोकांनी उचलायचा ठरवला आणि एका अननसमध्ये फटाके भरून तिला खायला दिला. तिने तो अननस खाल्ला. तिचं तोंड भाजलं, पोटातही जखमा झाल्या.

गर्भवती हत्तीणीसोबत असं करणाऱ्यांना उलटं टांगून मिरचीची धुरी द्यायला हवी !! – चित्र 2

यात ती हत्तीण प्रचंड जखमी झाली. नंतर तिला वाचवायचा प्रयत्न करण्यात आला. पण तिने जीव सोडला. तिने तिच्या पोटात असलेल्या 18 ते 20 महिन्याच्या लहान बाळासाठी ते अननस खाल्ले होते. पण यात तिच्यासहीत तिच्या बाळाचासुद्धा मृत्यु झाला आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख