१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री - म्हणजे उजाडत्या १५ ऑगस्टच्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे "Tryst with Destiny" हे भाषण आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासात अजरामर आहे. त्याचा मराठीत भावार्थ आज वाचूया !!
“नियतीशी केलेला करार”- खूप वर्षांपूर्वी आपण नियतीला आपण एक वचन दिले होते. आज ते वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे—पूर्णपणे किंवा संपूर्णपणे नाही, पण मोठ्या प्रमाणात नक्कीच.आज जेव्हा मध्यरात्रीच्या ठोक्याला सारे जग निद्रिस्त आहे, तेव्हा भारत नव्या जीवनाकडे आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल करत आहे.
इतिहासात असे क्षण फार क्वचित येतात—जेव्हा आपण जुन्या जगातून नव्या जगात पाऊल ठेवतो; एक युग संपते आणि दीर्घकाळ दडपून ठेवलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला अखेर आपला आवाज मिळतो. या पवित्र आणि गंभीर क्षणी भारताची आणि भारताच्या जनतेची सेवा करण्याची, तसेच त्याहून व्यापक अशा मानवतेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ घेणे, हेच योग्य ठरेल.
अनेक शतकांपूर्वी भारताने एका अखंड शोधयात्रेला सुरुवात केली. अगणित शतकांच्या प्रवासात प्रयत्नांची, यशाची आणि अपयशाची असंख्य पाने लिहिली गेली. सुख असो वा संकट, चांगले दिवस असोत वा वाईट—भारताने आपल्या ध्येयाकडे पाहणे कधीही सोडले नाही. तिला बळ देणारे आदर्शही कधी विस्मरणात गेले नाहीत.
आज दुर्दैवाच्या एका पर्वाचा अंत करीत आहोत आणि भारत पुन्हा स्वतःला नव्याने शोधणार आहे.मात्र आज आपण साजरा करत असलेले स्वातंत्र्य हे अंतिम ध्येय नाही. ही केवळ एक सुरुवात आहे—आपल्यासमोर उभ्या असलेल्या अधिक मोठ्या विजयांची आणि महान कर्तृत्वाची संधी आहे.
आता प्रश्न एवढाच आहे— ही संधी साधण्याइतके आपण धैर्यवान आहोत का? भविष्यातील आव्हाने स्वीकारण्याइतके आपण सज्ज आहोत का?
कारण स्वातंत्र्य मिळणे हा प्रवासाचा शेवट नसून, एका नव्या भारताच्या निर्मितीची सुरुवात आहे!!!




