स्कॅम मेसेजमधलं ते 'भंगार इंग्रजी' ही त्यांची चूक नाही, तर कोट्यवधींची कमाई करून देणारा 'मास्टरप्लॅन' आहे!
आपण अनेकदा 'नायजेरियन प्रिन्स' किंवा लॉटरीचे मेसेज पाहून खो-खो हसतो. त्यात तुटकी इंग्रजी भाषा आणि व्याकरणाच्या चुका पाहून आपल्याला वाटतं की हे स्कॅमर्स किती अडाणी आहेत.कॉर्मॅक हर्लेने नावाच्या एका अभ्यासकाने मायक्रोसॉफ्ट रिसर्च लॅबमध्ये या हजारो स्पॅम मेसेजचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की हे स्कॅमर्स मुद्दामहून चुकीचं इंग्रजी वापरतात.ही त्यांची चूक नसून, एक अत्यंत प्रभावी आणि अदृश्य 'फिल्टर' आहे. हर्लेने 'Why do Nigerian Scammers Say They are from Nigeria?' नावाचा एक जागतिक स्तरावर गाजलेला रिसर्च पेपर प्रसिद्ध केला. त्यांनी यामध्ये 'सिग्नल डिटेक्शन थिअरी'चा वापर करून या काळ्या धंद्याचे अर्थशास्त्र मांडले आहे.
एकाच वेळी १० लाख लोकांना स्पॅम ईमेल किंवा मेसेज पाठवण्याचा खर्च तांत्रिकदृष्ट्या शून्य असतो. खरा खर्च तेव्हा सुरू होतो, जेव्हा समोरून एखादी व्यक्ती त्या मेसेजला उत्तर देते. उत्तर आल्यावर स्कॅमरला त्या व्यक्तीशी फोनवर किंवा चॅटवर तासनतास बोलावं लागतं. हे मानवी श्रम महागडे असतात आणि त्यात वेळही खूप खर्च होतो.
समजा स्कॅमरने अगदी शुद्ध इंग्रजीत आणि अत्यंत विश्वासार्ह मेसेज पाठवला,तर हजारो हुशार लोक त्याला उत्तर देतील. आणि फोन केला तर संभाषणाच्या मध्यातच या हुशार लोकांना कुठेतरी शंका येईल आणि ते फोन कट करतील.अशा वेळी स्कॅमरचे २०-३० मिनिटे वाया जातात आणि हाती काहीच लागत नाही. अर्थशास्त्राच्या भाषेत याला 'फॉल्स पॉझिटिव्ह' (False Positive) म्हणतात.
स्कॅमर्सना ची पोलखोल करतील अशा हुशार लोकांची अजिबात गरज नसते. त्यांना फक्त अशाच लोकांची शिकार करायची असते,जे शेवटपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवून पैसे देतील. म्हणूनच ते मेसेजमध्ये इतक्या ढोबळ चुका करतात की कोणताही शहाणा माणूस तो मेसेज वाचताच डिलीट करेल. ज्यांना साधं व्याकरण समजत नाही किंवा इतका मोठा खोटेपणा ओळखता येत नाही, तेच लोक त्यांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता १०० टक्के असते. थोडक्यात, समाजातील सर्वात भोळसट ०.०१ टक्के लोक शोधण्यासाठी हे 'भंगार इंग्रजी' एक गाळणी म्हणून काम करतं. हे लोक एकदा जाळ्यात अडकले की पैसे गेलेच स्कॅमरच्या खिशात !! हे स्कॅमर्स कोणतेही अडाणी लोक ते आपला वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक स्वतःची प्रतिमा 'अडाणी' म्हणून सादर करतात
आकडेवारी सांगते की, हे फिल्टर इतके प्रभावी आहेत की उत्तर देणाऱ्या प्रत्येक १० लोकांपैकी किमान एकाकडून पैसे उकळण्यात स्कॅमर्स यशस्वी होतात.तुम्हालाही ही MSEB/MGLकिंवा 'बँकेच्या नावाखाली येणारे मेसेज अनेकदा अशाच विचित्र मराठी किंवा इंग्रजी भाषेत असतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही असा एखादा मेसेज पाहाल, तेव्हा समजा की तो तुमच्यासाठी नाहीच. तो मेसेज एका अशा सावजाचा शोध घेत आहे, जो तर्काच्या पलीकडे जाऊन आंधळा विश्वास ठेवू शकतो.
सायबर गुन्हेगारीच्या या जगात तुमची हुशारी तुम्हाला वाचवत नाही, तर तुमची 'संशय घेण्याची वृत्ती' तुम्हाला सुरक्षित ठेवते. स्कॅमर्सना तुमच्या बुद्धिमत्तेची भीती वाटत नाही, तर त्यांना फक्त त्यांच्या मौल्यवान वेळेची काळजी असते. स्कॅमरसाठी व्याकरणाच्या चुकांकडे दुर्लक्ष करणारा माणूस हा सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असतो.






