मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

पाहा पण प्रेमानं.. अहो, लग्न ठरवलंय वाघानं..

1 मिनिट वाचन
शेअर करा:
पाहा पण प्रेमानं..  अहो, लग्न ठरवलंय वाघानं..

ऐका हो ऐका.. आपल्या एका वाघाची शेळी होतेय. अहो, हे आम्ही नाही, तर स्वत: वाघच म्हणतोय.

आपल्या सर्वांच्या लाडक्या अमेय वाघनं काही वेळापूर्वीच फेसबुकवर पोस्ट करून हे जाहिर केलंय. गंमत म्हणजे त्यांच्या लग्नाला फक्त १२ दिवस राहिलेत. त्याच्या होणार्‍या बायकोचं नांव आहे साजिरी देशपांडे! आणि ते गेले १३ वर्षं एकमेकांना ओळखत आहेत. साजिरी कोलगेट-पामोलिवमध्ये काम करते असं ऐकण्यात येतं आहे.

काही महिन्यांपूर्वी अमेय वाघ आणि मिथिला पालकरचे व्हॅलेंटाईनच्या आसपास एकत्र फोटो आले तेव्हा लोकांच्या भिवया ऊंचावल्या होत्या. नंतर मात्र तो मुरांबाच्या प्रमोशन्सचा भाग असल्याचं कळालं. मात्र ही बातमी त्यानं स्वत:च सांगितली असल्यानं खरी आहे.

गेल्या वर्षी बरेच मराठी सेलेब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले होते. यावर्षीची सुरूवात आपल्या लाडक्या वाघानं केलीय!!

 

टॅग्स:

संबंधित लेख