कॅन्सरच्या रुग्णांना रोगाशी लढण्याची ताकद देणारे पश्चिम घाटातील एक छोटे झाड 'नरक्या' ! कर्करोगविरोधी औषधांसाठी महत्त्वाची भारतीय वनस्पती
भारताच्या पश्चिम घाटात आढळणारे Nothapodytes nimmoniana हे तुलनेने लहान आकाराचे सदाहरित झाड आहे.या झाडाच्या असह्य घाणेरड्या वासामुळे त्याला नरक्या, घाणेरा इत्यादी स्थानिक नावांनी ओळखले जाते.
वनस्पतिशास्त्राच्या नामांकन पध्दतीप्रमाणे ते Icacinaceae या वनस्पती कुळातील आहे.या झाडात आढळणाऱ्या कॅंप्टोथिसिन (CPT) या कॅन्सर विरोधी नैसर्गिक अल्कलॉइडमुळे त्याला विशेष औषधी महत्त्व प्राप्त झाले आहे. कॅंप्टोथिसिन वर प्रक्रिया करून मिळणाऱ्यासंयुगांचा कर्करोगाच्या उपचारात उपयोग होतो.
कॅंप्टोथिसिन रासायनिक वर्गातील संयुग आहे. त्याचा शोध १९६०च्या दशकात लागला. या संयुगाचा नैसर्गिक स्रोत चीनमधील Camptotheca acuminata हे झाड आहे; परंतु भारतातील Nothapodytes nimmoniana हे देखील कॅंपोथिसिन मिळवण्याचे अत्यंत महत्त्वाचे स्रोत ठरले आहे.
कॅंप्टोथिसिन संयुग कर्करोगाच्या पेशींवर कसे कार्य करते?
कर्करोगाच्या पेशी वेगाने विभाजित होत असतात. या प्रक्रियेत DNA ची प्रतिकृती तयार करण्यासाठी विविध एन्झाइम्स आवश्यक असतात. हे संयुग DNA ची प्रतिकृती निर्माण करणारे एन्झाइम निर्माण होण्यात अडथळे आणते त्यामुळे DNA ची प्रतिकृती तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि अखेरीस कर्करोगाच्या पेशींमध्ये घट होते
कॅंप्टोथिसिन चे औषध कसे बनते? मूळ कर्करोगविरोधी औषधांसाठी महत्त्वाची भारतीय वनस्पती काही मर्यादा होत्या—विशेषतः त्याची पाण्यातील विद्राव्यता कमी असणे आणि विषारी परिणाम. त्यामुळे शास्त्रज्ञांनी त्याच्या रासायनिक संरचनेत बदल करून अधिक वेगळी उपयुक्त संयुगे विकसित केली.त्यापैकी महत्त्वाची औषधे म्हणजे:Irinotecan आणि Topotecan
भारतासाठी या वनस्पतीचे विशेष महत्त्व: या झाडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील कॅंप्टोथिसिनचे प्रमाण वेगवेगळ्या प्रदेशांतील आणि वेगवेगळ्या झाडांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलते. पश्चिम घाटातील काही निवडक झाडांमध्ये तुलनेने जास्त प्रमाण आढळल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. एका अभ्यासात काही झाडांमध्ये पूर्वी नोंदलेल्या प्रमाणापेक्षा ५ ते ८ पट अधिक कॅंप्टोथिसिन आढळले.पण याच गुणधर्मामुळे एक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण झाली.कॅंप्टोथिसिन मिळवण्यासाठी पूर्वी या वनस्पतीच्या मुळांचा, खोडाचा किंवा सालाचा वापर केला जात असे. विशेषतः मुळांसाठी झाड उपटल्यास संपूर्ण झाड नष्ट होते. पश्चिम घाटात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वनस्पतींची तोड झाल्याची नोंद संशोधनात आहे.या झाडांची तस्करी केली जाते
या संपूर्ण कथेत एक विलक्षण विरोधाभास आहे—मानवाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढाईत उपयोगी ठरलेले एक रसायन मिळवण्यासाठी निसर्गातील त्याच वनस्पतीचा मोठ्या प्रमाणावर नाश होण्याचा धोका निर्माण झाला आहे.म्हणून या वनस्पतीचे खरे भविष्य केवळ औषधनिर्मितीत नाही,तर संवर्धन करून कॅंप्टोथिसिनचे शाश्वत उत्पादन करण्यात आहे.






