मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

तुमचं SBI डेबिट कार्ड ब्लॉक झालंय? घाबरू नका. 6 लाख लोकांची झाली आहेत.

1 मिनिट वाचन
शेअर करा:
तुमचं SBI डेबिट कार्ड ब्लॉक झालंय? घाबरू नका. 6 लाख लोकांची झाली आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास सहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत. एसबीआयच्या सिस्टीममध्ये सुरक्षेशी निगडीत बग शिरण्याच्या भीतीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बँकेतर्फे ही पावलं उचलण्यात आली आहेत.

कोणतीही पूर्वसुचना दिल्याशिवाय कार्ड ब्लॉक केल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. मात्र ब्लॉक झालेल्या कार्डसाठी पुन्हा अर्ज करता येऊ शकतो. 

एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर एसबीआयकडून ग्राहकांना नवीन कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहकांना आपल्या बँक शाखेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे.बँकेकडून ग्राहकांना फॉर्म दिला जाईल. त्या फॉर्मवर बँक खात्याशी संबंधित सर्व माहितीचा तपशील द्यावा लागेल. फॉर्म भरताना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अशी कागदपत्र जवळ असणं गरजेचं आहे.

एटीएमच्या गैरव्यवहारापासून सुरक्षित राहण्यासाठी ग्राहकांनी पासवर्ड बदलावे, असं आवाहन बँकेकडून करण्यात आलं आहे. कुणाचा पासवर्ड किंवा कसलीही माहिती हॅक झाली असल्यास पासवर्ड बदलल्यामुळे गैरव्यवहार रोखता येऊ शकतात.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!
लाइफस्टाइल

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!

लोक गिफ्ट व्हाउचर्स विसरल्यामुळे किंवा मुदत संपल्यामुळे कंपन्या 'ब्रेकेज'च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा नफा कसा कमावतात?

२० जून, २०२६