मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!

3 मिनिट वाचन

लोक गिफ्ट व्हाउचर्स विसरल्यामुळे किंवा मुदत संपल्यामुळे कंपन्या 'ब्रेकेज'च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा नफा कसा कमावतात?

शेअर करा:
आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!

एखाद्या रविवारी कपाट आवरायला घ्या आणि अचानक एखाद्या कॉफी शॉपचे पाचशे रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर सापडेल. ते हातात आल्यावर जो आनंद होईल, तो पुढच्याच सेकंदाला विरेल कारण त्याची मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपलेली असेल आपण सगळेच कधी ना कधी असे व्हाऊचर विसरतो किंवा ते हरवतो. आपल्याला वाटतं की आपलेच फक्त पाचशे रुपये वाया गेले, पण कंपन्यांसाठी हा आकडा कोट्यवधींच्या घरात असतो.

कॉर्पोरेट जगतात याला 'ब्रेकेज' (Breakage) असं म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर, ग्राहकाने पैसे दिले पण वस्तू किंवा सेवा घेतलीच नाही. सीसीडी, मॅकडोनाल्ड किंवा स्टारबक्स सारख्या कंपन्यांसाठी हा शंभर टक्के निव्वळ नफा असतो. ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील रिटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रातील सुमारे १५ ते २० टक्के गिफ्ट कार्ड्स कधीच वापरली जात नाहीत. हा पैसा थेट कंपनीच्या तिजोरीत जमा होतो आणि त्या बदल्यात त्यांना एक कप कॉफीही द्यावी लागत नाही.

या कंपन्या केवळ तुमच्या विसरभोळेपणावर अवलंबून नसतात. 'स्पिलओव्हर इफेक्ट' (Spillover Effect) नावाचे एक गणित यामागे काम करते. समजा तुमच्याकडे ५०० रुपयांचे व्हाऊचर आहे, पण ऑर्डर देताना बिल ६५० रुपये होते. अशा वेळी तुम्ही वरचे १५० रुपये खिशातून देता. व्हाऊचरमुळे तुम्ही हॉटेलमध्ये खेचले जाता आणि कंपनीला अतिरिक्त रोख रक्कम मिळते.

या कंपन्यांच्या ताळेबंदात हा पैसा 'फ्लोट रेव्हेन्यू' म्हणून ओळखला जातो. तुम्ही व्हाऊचर खरेदी करता तेव्हाच पैसे कंपनीकडे जमा होतात. ते व्हाऊचर तुम्ही सहा महिन्यांनी वापरा किंवा वापरूच नका, तोपर्यंत कंपनी त्या पैशांवर व्याज कमावते. हजारो ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अशा प्रकारे कंपन्यांकडे पडून असतात. या पैशांचा वापर कंपन्या त्यांच्या विस्तारासाठी किंवा गुंतवणुकीसाठी बिनदिक्कतपणे करतात.

हे एक प्रकारचे मानसशास्त्रीय जाळे आहे. सणासुदीला किंवा वाढदिवसाला आपण कोणाला तरी गिफ्ट कार्ड देतो तेव्हा ते कार्ड पाकिटात कुठेतरी हरवून जाण्याची शक्यताच जास्त असते. अनेकदा 'डिस्काउंट'च्या नावाखाली ॲग्रिगेटर ॲप्सवरून ही व्हाऊचर्स विकली जातात. तिथेही 'लिमिटेड पिरीयड ऑफर'चा दबाव टाकून ग्राहकाला खरेदी करायला लावले जाते. मुदत संपली की ग्राहकाचा हक्क संपतो आणि कंपनीची चांदी होते.

डिजिटल पेमेंटचा वापर वाढला असला तरी, गिफ्ट कार्ड्सची क्रेझ कमी झालेली नाही. उलट, ब्रँडेड गिफ्ट कार्ड्स देणे ही आता एक 'स्टेटस सिम्बॉल' बनली आहे. कंपन्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुमच्या विसरभोळेपणालाही एक किंमत असते, हे लक्षात ठेवलेले बरे.

पुढच्या वेळी जेव्हा एखादे गिफ्ट व्हाऊचर हातात येईल, तेव्हा ते लगेच वापरा. कारण तुम्ही ते विसरलात, तर एखाद्या बड्या कंपनीच्या नफ्याचा आकडा विनासायास वाढणार आहे. तुमच्या पाकिटात सध्या असे किती 'एक्स्पायर्ड' कागदाचे तुकडे पडले आहेत, चेक करा एकदा?

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलकंपनी विकून कामगारांना वाटले २ हजार कोटी: ग्रॅहम वॉकर यांचा अनोखा आदर्श!आपली कंपनी १.७ अब्ज डॉलर्सना विकल्यानंतर ग्रॅहम वॉकर यांनी ५४० कर्मचाऱ्यांना २ हजार कोटी रुपयांचा बोनस वाटून नवा आदर्श ठेवला.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा
लाइफस्टाइल

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

एका तिकिटावर १०,००० तासांचा प्रवास आणि ३ कोटी मैल: स्टीव्हन रॉथस्टीनची 'लाईफस्टाईल'
लाइफस्टाइल

एका तिकिटावर १०,००० तासांचा प्रवास आणि ३ कोटी मैल: स्टीव्हन रॉथस्टीनची 'लाईफस्टाईल'

अमेरिकन एअरलाइन्सचा अनलिमिटेड पास घेऊन २१ वर्षांत १०,००० वेळा मोफत फर्स्ट क्लास प्रवास करणाऱ्या स्टीव्हनची रंजक गोष्ट.

६ जुलै, २०२६

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!
लाइफस्टाइल

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!

फुकट मिळणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी आणि भविष्यातील पाणी टंचाईच्या संकटावर प्रकाश टाकणारा विचारप्रवर्तक लेख.

१० जून, २०२६

३५० दशलक्ष डॉलर्स घेऊन अदृष्य झालेला 'तो': जॉन रफोची न सुटलेली गुढ कथा
लाइफस्टाइल

३५० दशलक्ष डॉलर्स घेऊन अदृष्य झालेला 'तो': जॉन रफोची न सुटलेली गुढ कथा

अमेरिकन बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा करून २८ वर्षांपासून फरार असलेल्या जॉन रफोची थरारक आणि रहस्यमयी कथा.

२९ एप्रिल, २०२६

१९ कोटी डॉलर्सचा 'डिजिटल' मृत्यू: जेराल्ड कॉटनचं रहस्य आणि रिकाम्या तिजोऱ्यांची गोष्ट
लाइफस्टाइल

१९ कोटी डॉलर्सचा 'डिजिटल' मृत्यू: जेराल्ड कॉटनचं रहस्य आणि रिकाम्या तिजोऱ्यांची गोष्ट

कॅनडातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजचा मालक जेराल्ड कॉटनच्या मृत्यूनंतर १६०० कोटी रुपये कसे गायब झाले, याची ही थरारक कथा.

१८ एप्रिल, २०२६