मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विवस्त्र लोकांचं एक विचित्र गाव...!!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
विवस्त्र लोकांचं एक विचित्र गाव...!!!

अनोखं राहणीमान, भाषा, परंपरा, खाद्य संस्कृती आणि कपडे यामुळे अनेक देश कुतूहलाचा विषय ठरतात. अश्याच एका गावाविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे ठिकाण आहे ब्रिटनच्या ब्रिकेटवुड जवळ असलेलं ‘स्पीलप्लाट्ज’ नावाचं गाव. स्पीलप्लाट्जचं वैशिष्ठ्य म्हणजे या गावातले लहान-मोठे, म्हातारे, तरुण, स्त्री-पुरुष कोणीही कपडे घालत नाहीत. ऐकायला थोडं अश्लील वाटेल पण या मागचं कारण थोडं वेगळं आहे मंडळी.

निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाशी एकरूप होण्यासाठी अशी जीवन पद्धती अंगिकारली असल्याचं इथे राहणारे लोक म्हणतात. गेल्या ८५ वर्षापासून इथले अबाल वृद्ध कपडे न घालता विवस्त्र जीवन जगतायत. गावची ही प्रथाच आहे म्हणा ना. या गावचा शोध १९२९ साली इसुल्ट रिचर्डसन लावला होता. त्यानंतरच इथल्या लोकांनी विवस्त्र जीवन जगण्याचं ठरवलं असल्याचं म्हटलं जातं.

अशा राहणीमानामुळे इथले लोक आधुनिक जगापासून तुटलेले आहेत का ? तर तस अजिबात नाही. या गावात पब, बंगले, स्विमिंग पूल वगैरे सगळं अत्याधुनिक आहे मंडळी.

Image result for britain naked villageस्रोत

आता तुम्ही म्हणाल की थंडीतही विवस्त्र कसे राहत असतील हे लोक ? तर त्याचं असं आहे की थंडी मध्ये कपडे घालण्याची या लोकांना मुभा देण्यात आली आहे.

इथे जर तुम्हाला पर्यटक म्हणून जायचं असेल तर तुम्हालाही इथे विवस्त्रचं राहावं लागेल. या गावात अनेक पर्यटक येत असतात आणि भाड्याने घर घेऊन राहतात. इथे जरी बाहेरची माणसे येऊन विवस्त्र राहत असली तरी गावाच्या नियमांचे त्यांना काटेकोर पालन करावे लागते.

आजच्या आधुनिक आणि फॅशनेबल जगात असं वेगळं राहणीमान आश्चर्याचीच बाब आहे. नाही का ?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

भारतातलं असं गाव जिथे 'कार्ल मार्क्स' शेतात राबतो आणि 'लेनिन' शाळेत जातो!
लाइफस्टाइल

भारतातलं असं गाव जिथे 'कार्ल मार्क्स' शेतात राबतो आणि 'लेनिन' शाळेत जातो!

तामिळनाडूच्या वन्नी वेलाम पट्टी गावात गेल्या सात दशकांपासून मुलांची नावे मार्क्स, लेनिन आणि स्टॅलिन ठेवण्याची अनोखी परंपरा चालत आली आहे.

२९ जून, २०२६