मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

एक्सेल शिकवून सहा आकडी कमाई करणारी सोशल मिडिया स्टार - मिस. एक्सेल!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
एक्सेल शिकवून सहा आकडी कमाई करणारी सोशल मिडिया स्टार - मिस. एक्सेल!!

सध्या सोशल प्लॅटफॉर्ममुळे अनेक जण चांगली कमाई करत आहेत. यात जर एखाद्या विषयात तुम्ही पारंगत असाल तर मग किती कमाई होईल याची गणतीच नाही. होय! याचे उत्तम उदाहरण म्हणजे २७ वर्षीय कॅट नॉर्टन! हे नाव तुम्ही कदाचित ऐकले नसेल, पण तिने मायक्रोसॉफ्ट एक्सेल ऑनलाइन शिकवण्यासाठी तिची मोठ्या कंपनीतली नोकरी सोडली आणि आज ती करोडो कमवत आहे!

इंस्टाग्रामवर कॅट @miss.excel म्हणून ओळखली जाते. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एकदम कामाचे सॉफ्टवेअर आहे. आपण त्यातल्या १०%ही सुविधा वापरत नसू. पण ते जितके सोपे, तितकेच कठीण सॉफ्टवेअर समजले जाते. यात काही functions, स्क्रिप्टस् तर समजायला खूप अवघड असतात. पण कॅट नॉर्टनने ते अगदी सोपे केले आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये तिने Instagram आणि TikTok वर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यात तीने एक्सेल Google Sheets च्या टिप्स आणि युक्त्या देण्यास सुरुवात केली. ती हे सर्व खूप सोप्या पद्धतीने ती शिकवू लागली. त्यामुळे तिचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. केवळ एका वर्षाच्या आत Instagram आणि TikTok वर तिचे १ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले. जोरदार कमाई सुरू झाली आणि तिचे जीवन अक्षरशः बदलून गेले.

एक्सेल शिकवून सहा आकडी कमाई करणारी सोशल मिडिया स्टार - मिस. एक्सेल!! – चित्र 1

एप्रिल २०२१ मध्ये तिने सहा आकडी कमाई केली. तिने यातच पुढे जायचे ठरवले आणि नोकरी सोडली. हळूहळू तिची कमाई आणि शिकवण्याचे पॅशन वाढले. ती एक्सेलची शिकवणी घेण्यासाठी बऱ्याच शहरात फिरते. तिने सात-आकडी कमाईचे उद्दिष्ट ठेवले आहे. कॅट नॉर्टन म्हणजे मिस एक्सेल आता पूर्ण-वेळ ट्रेनिंग घेते. ती मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि गुगल शीट्सच नाही, तर इतर मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्टही शिकवते.

कुठलही ज्ञान तुम्हाला आर्थिकरित्या स्वतंत्र बनवू शकते. फक्त त्याचा उपयोग कसा करायचा यावर गोष्टी अवलंबून असतात. आज इंटरनेटने जग जवळ आले आहे. अनेक प्लॅटफॉर्म ही उपलब्ध आहेत. मग त्याचा उपयोग करून बक्कळ कमाई करायला काय हरकत आहे?

तुम्हांला तिच्याकडून एक्सेल शिकायचं असेल तर हे आहे तिचं इन्स्टा अकाऊंट!! https://www.instagram.com/miss.excel/?hl=en

शीतल दरंदळे

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलसोशल मिडियावरचे स्टार : इंजिनिअरिंगमध्ये अपयश, फिटनेस ट्रेनर ते यशस्वी युटूबर हा रणवीर अलाहाबादियावाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

SBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!
लाइफस्टाइल

SBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!

Global Finance या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने SBI ला ‘World’s Best Consumer Bank’ हा बहुमान दिला आहे. पण सोशल मीडियावर मात्र बँकेच्या सेवेवरून भन्नाट विनोद व्हायरल होत आहेत.

२१ ऑक्टोबर, २०२६