मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आयपीएलचा धमाका: टीम्स आणि स्टेडियम्स जाणून घ्या

2 मिनिट वाचन
शेअर करा:
आयपीएलचा धमाका: टीम्स आणि स्टेडियम्स जाणून घ्या

देशात एखादा सोहळ्याप्रमाणे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ९ एप्रिल पासून सुरू होणारी ही स्पर्धा दीड महिने चालून ३० मे रोजी संपणार आहे. पहिला सामना हा चेन्नई येथे मुंबई आणि बँगलोर दरम्यान खेळला जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना हा अहमदाबाद येथे नवीन तयार करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

आयपीएल २०२१ ची विशेषतः म्हणजे यावेळी कुठलाही संघ त्यांच्या होम ग्राऊंडवर खेळणार नाही. तसेच यावेळी सर्व ५६ सामने हे मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, बँगलोर याच शहरांतील मैदानांवर खेळले जाणार आहेत. कोरोनामुळे यावेळी हे सामने विविध ठिकाणी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आयपीएलचा धमाका: टीम्स आणि स्टेडियम्स जाणून घ्या – चित्र 1

२०२१ आयपीएल देखील विना प्रेक्षकांचे खेळले जाईल याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेले कोरोनाचे रुग्ण यासाठी कारणीभूत ठरणार आहे. 

खालील 8 संघ यावेळी विजेतेपदासाठी भिडणार आहेत.

१) मुंबई इंडियन्स

२) चेन्नई सुपर किंग्ज

३) राजस्थान रॉयल्स

४) सनरायजर्स हैदराबाद.

आयपीएलचा धमाका: टीम्स आणि स्टेडियम्स जाणून घ्या – चित्र 2

५) किंग्ज इलेव्हन पंजाब

६) कोलकाता नाईट रायडर्स

७) दिल्ली कॅपिटल्स

८) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

अवघ्या काही महिन्यांच्या अंतराने दुसरी आयपीएल होत असली तरी उत्साह मात्र कमी झालेला दिसत नाही. अजून महिन्याभराने पुन्हा एकदा आयपीएलचा रणसंग्राम सुरू झालेला दिसणार आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख