आयुष्यात आपण अनेकदा एखाद्या मोठ्या व्यक्तीला समोर ठेवून त्याच्यासारखं बनण्याची स्वप्नं बघत असतो. अशावेळी काही लोक त्याच्यासारखं चालण्याचा, बोलण्याचा, दिसण्याचा प्रयत्न करतात. काही लोक तर त्यांचे कपडे, अगदी त्यांचा आवाजसुद्धा कॉपी करतात. राव, अशा आवडीचं विकृत रूप बघायचं असेल तर इराणमधल्या या मुलीला बघा.
झालंय असं की, इराणची राजधानी तेहरानमध्ये राहणारी साहर ताबर ही मुलगी अँजेलिना जॉलीची खूप मोठी फॅन आहे. तिला अँजेलिनासारखं दिसायचं होतं. यासाठी तिने महागडे कॉस्मेटीक वापरले नाहीत, तर तिने सरळ सरळ प्लास्टिक सर्जरीज् केल्या आहेत. आता ती कशी दिसते ते एकदा बघाच.
बघितलं? मंडळी, तिने तब्बल ५० प्लास्टिक सर्जरीनंतर असं भयानक रूप धारण केलं आहे. याशिवाय तिने वजन मेंटेन करण्यासाठी स्पेशल डाएट प्लान बनवला होता. तिचं बदललेलं रूप तिने इंस्टाग्रामवर शेअर केलं आणि इंस्टाग्रामवर भयाण शांतता पसरली.
या सगळ्याचा शेवट असा झालंय की ती अँजेलिनासारखी तर झाली नाहीच, पण तिचं खरं सौंदर्य सुद्धा तिने गमावलंय!!
भाऊ फॅन असावं पण हे जरा अति झालं...नाही का?
एंजेलिना जोली सारखं दिसण्यासाठी तिने केली 50 वेळा प्लास्टिक सर्जरी, आता बघा काय झालंय तिच्या सोबत
1 मिनिट वाचन

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

लाइफस्टाइल
वॉर्ड नंबर पाच, केईएम
१३ फेब्रुवारी, २०२५

लाइफस्टाइल
'मिस्टर ए' आणि लंडनचा तो 'हनी ट्रॅप': काश्मीरच्या महाराजांची एक विसरलेली गोष्ट!
२ फेब्रुवारी, २०२६

लाइफस्टाइल
‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?
२४ फेब्रुवारी, २०२५

लाइफस्टाइल
तुमच्या उत्पादनाची टॅग-लाईन बनवताय ? आधी ही रेडबुलची केस वाचा !
४ फेब्रुवारी, २०२५

