मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मिसेस मुख्यमंत्रींचा आल्बम येतोय अमिताभ बच्चनसोबत..

2 मिनिट वाचन
शेअर करा:
मिसेस मुख्यमंत्रींचा आल्बम येतोय अमिताभ बच्चनसोबत..

अमृता फडणवीस यांची ओळख फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी इतकीच नाहीय. त्यांची गाण्याची आवड जगजाहीर आहे.  यापूर्वीही त्यांनी गायलेली काही गाणी रिलीज झाली आहेत.

यावेळची गोष्ट मात्र निराळी आहे. हा ’फिर से’ नावाचा अमृतांच्या गाण्यांचा आल्बम आहे. त्यात त्या स्वत: आणि अमिताभ बच्चन काम करत आहेत. नुकत्याच पुर्नबांधकाम झालेल्या ऑपेरा हाऊसमध्ये याचं शूटिंग काल पार पडलं.  पण गंमत अशी आहे की त्या  गाण्याची किंवा शूटिंगची चर्चा न होता सगळीकडे अमृतांच्या ग्लॅमरस लाल ड्रेसची आणि त्यावेळेस घातलेल्या हाय हिल्सच्या चपलांचीच चर्चा सर्व वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स करत आहेत. त्यांचाही काय दोष म्हणा, राजकारणी स्त्रिया किंवा राजकारणातल्या लोकांच्या पत्नींना साडीतच पाहायची सवय सगळ्यांना झालीय. 

आडवळणानं का होईना, पण हा ड्रेसकोडमध्ये होत असलेला बदल सुखावह आहे. बराक ओबामा टीशर्ट घालून फिरला तर त्याचं कौतुक होतं पण आपल्याकडच्या लोकांनी त्यांचा नेहमीचा ड्रेसकोड थोडा बदलला की लगेच त्याची पेपरमध्ये हेडलाईन होते. असो, सौ. फडणवीसांनी तर त्या फक्त नवर्‍याबरोबर सभांना हजेरी लावणारी बायको नाहीत हे सिद्ध केलंय.  तुम्हांला माहितच असेल, अमृता यावर्षी पुण्यात पार पडलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये शो-स्टॉपर म्हणूनही वावरल्या होत्या. 

स्त्रोत

पाहूयात मग, हा ’फिर से’ कधी रिलीज होतोय ते.

टॅग्स:

संबंधित लेख