मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

९० वर्षांच्या आजींच्या मृत्यूवर पैसे लावले आणि वकिलाचेच दिवाळे निघाले!

3 मिनिट वाचन

जीन कॅलमेंट यांच्या घरावर 'व्हायेजर' करार करणाऱ्या फ्रेंच वकिलाचा अजब डाव कसा उलटला, त्याची रंजक कथा.

शेअर करा:
९० वर्षांच्या आजींच्या मृत्यूवर पैसे लावले आणि वकिलाचेच दिवाळे निघाले!

ही गोष्ट आहे १९६५ सालची.आंद्रे-फ्रांस्वा राफ्रे नावाचा एक ४७ वर्षांचा तगडा वकील होता.वकील म्हणजे आपल्या कडे ज्याला नोटरी म्हणतात असा तो वकील होता.त्याला फ्रान्समधल्या अर्ल्स शहरातल्या एका ९० वर्षांच्या आजींचं घर खूप आवडलं होतं.त्याने एक डोकं लावलं आणि त्या आजींशी,म्हणजे जीन कॅलमेंट यांच्याशी एक 'व्हायेजर' (Viager) करार केला.व्हायेजर म्हणजे जन्मभर आजींना पेन्शन देण्याचा करार केला.

आता आपल्याकडे भारतीय बॅंका अशा प्रकारचा करार करतात ज्याला रिव्हर्स मॉर्गेज तसाच काहीसा हा करार होता..या करारानुसार आपल्या घराच्या मालकीत असलेल्या इक्विटीचा काही भाग रोख पैशात रूपांतरित करण्याची सुविधा. नेहमीच्या गृहकर्जात आपण बँकेला दर महिन्याला हप्ता भरतो; पण रिव्हर्स मॉर्गेजमध्ये बँक आपल्याला पैसे देते.आपण मात्र आपल्या घरातच राहू शकतो. कर्जाची परतफेड साधारणपणे घर विकल्यावर किंवा आपण घर सोडल्यावर केली जाते.

पण त्या काळी हा करार म्हणजे एक प्रकारचा जुगारच होता. आंद्रे आजींना त्या घरासाठी दरमहा २५०० फ्रँक्स देणार आणि आजी वारल्यानंतर ते घर आंद्रेचं होणार.आता विचार करा, ९० वर्षांची म्हातारी आणखी किती दिवस जगणार? जास्तीत जास्त दोन-चार वर्ष, असा आंद्रेचा हिशोब होता. त्याला वाटलं, अगदी स्वस्त दरात आपल्याला आलिशान घर मिळेल.

पण ... नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. वर्ष सरली, दशकं उलटली, पण आजी काही जाईनात! उलट त्या रोज सकाळी सायकल चालवायच्या, आवडीने चॉकलेट खायच्या आणि रेड वाईन प्यायच्या.आंद्रे बिचारा दर महिन्याला इमानेइतबारे चेक फाडत राहिला.

बघता बघता आंद्रे स्वतः ७७ वर्षांचा झाला आणि दुर्दैवाने १९९५ मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याने घराच्या मूळ किमतीपेक्षा दुप्पट पैसे आजींना मोजले होते, पण त्याला त्या घराची किल्ली कधीच मिळाली नाही. करारानुसार त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाला काही काळ ते पैसे भरावे लागले.

आणि आपल्या जीन आजी? त्या चक्क १२२ वर्षांपर्यंत जगल्या! जगातील सर्वात जास्त काळ जगणारी व्यक्ती म्हणून आजही त्यांचं नाव इतिहासात कोरलेलं आहे. त्यांनी त्या वकिलाला तर काय, पण त्याच्या पुढच्या पिढीलाही 'वेटिंग'वर ठेवलं.

आपल्याकडे म्हणतात ना, 'हिशोब देवाचा आणि अहंकार माणसाचा'. कधीकधी आपण भविष्याची इतकी अचूक आकडेमोड करतो की, समोर उभं असलेलं 'अनपेक्षित आयुष्य' आपल्याला विसरूनच जातं. शेवटी, कोणाचं आयुष्य किती मोठं असेल, हे कोणत्याच करारावर नाही तर नशिबाच्या स्वाक्षरीवर अवलंबून असतं.

निसर्गाच्या या अजब खेळापुढे मानवी बुद्धी किती तोकडी पडते, नाही का?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'गाढव' जेव्हा डॉक्टर होतं: फ्रान्समधील मानसिक उपचारांची एक अनोखी गोष्ट
आरोग्य

'गाढव' जेव्हा डॉक्टर होतं: फ्रान्समधील मानसिक उपचारांची एक अनोखी गोष्ट

फ्रान्सच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डिप्रेशन आणि ऑटिझमच्या रुग्णांवर उपचारासाठी गाढवांची अनोखी मदत घेतली जात आहे.

६ जुलै, २०२६

शिक्षकाच्या प्रेमात पडलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन!
राजकारण

शिक्षकाच्या प्रेमात पडलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन!

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट यांची अजब प्रेमकथा, जी एका वर्गातून सुरू झाली होती.

५ सप्टेंबर, २०२६