मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

तोंडातून धूर काढला म्हणून ७ वर्षं जेलची हवा; एका स्पॅनिश खलाशाची अजब गोष्ट!

3 मिनिट वाचन

कोलंबससोबत प्रवास करून युरोपमध्ये पहिल्यांदा तंबाखू आणणाऱ्या रॉड्रिगोला तोंडातून धूर काढल्यामुळे चक्क ७ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

शेअर करा:
तोंडातून धूर काढला म्हणून ७ वर्षं जेलची हवा; एका स्पॅनिश खलाशाची अजब गोष्ट!

नोव्हेंबर १४९२ मध्ये क्युबाच्या किनाऱ्यावर उतरलेल्या रॉड्रिगो दी जेरेझ या स्पॅनिश खलाशाला तंबाखू ओढल्याबद्दल चक्क ७ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.ख्रिस्तोफर कोलंबसच्या पहिल्या ऐतिहासिक सफरीवर गेलेला रॉड्रिगो हा युरोपमधील पहिला 'स्मोकर' ठरला, पण ही 'निकोटीनच्या धुराची किक' त्याला अनपेक्षितपणे महागात पडली.

त्या काळात युरोपियन लोकांसाठी 'धुम्रपान' हा प्रकार पूर्णपणे परका होता. क्युबामध्ये असताना रॉड्रिगोने स्थानिक आदिवासींना वाळलेली पाने गुंडाळून ती पेटवून ओढताना पाहिले. कुतूहलापोटी त्यानेही एक झुरका मारला आणि त्याला निकोटिनची चटक लागली.

रॉड्रिगो हा जगातील पहिला युरोपियन निकोटिन युजर बनला होता. त्याने ही वाळलेली पाने गोळा केली आणि जेव्हा तो आपल्या मायदेशी, स्पेनमधील 'आयमोंटे' (Ayamonte) शहरात परतला, तेव्हा त्याने सार्वजनिक ठिकाणी 'विड्या' ओढायला सुरुवात केली.

त्या काळात अंधश्रद्धेचा पगडा जास्त होता.रॉड्रिगोच्या शेजाऱ्यांनी जेव्हा त्याच्या नाकातून आणि तोंडातून धूर निघताना पाहिला, तेव्हा त्यांची बोबडीच वळली. "फक्त सैतानच मानवी शरीरातून असा धूर बाहेर काढू शकतो," असा त्यांचा ठाम समज झाला.त्यांनी तातडीने याची तक्रार 'स्पॅनिश इन्क्विझिशन'कडे केली. धार्मिक कायद्यानुसार रॉड्रिगोला अटक करण्यात आली. त्याच्यावर सैतानाशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला थेट तुरुंगात डांबले गेले.

रॉड्रिगोने पुढची ७ वर्षं अंधारकोठडीत काढली. गंमत म्हणजे, तो जेव्हा ७ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आला, तेव्हा जगाचे चित्र पूर्णपणे बदलले होते. ज्या 'धुरासाठी' त्याला शिक्षा झाली, तो तंबाखू आता संपूर्ण स्पेनमध्ये लोकप्रिय झाला होता.

आजकाल रेल्वे स्टेशन किंवा टपरीवर उभं राहून धूर सोडणाऱ्यांना हे वाचून धक्का बसेल. रॉड्रिगोने धूर काढला म्हणून त्याला जेल झाली, पण आज आपण धुराच्या नादात स्वतःचं आयुष्यच 'जेल' (हॉस्पिटल) मध्ये ढकलत आहोत.

रॉड्रिगो सुटला तेव्हा तंबाखूने बाजारपेठ व्यापली होती, पण त्याने आपली उमेदीची ७ वर्षं अशा एका सवयीसाठी गमावली जी पुढे जगातील सर्वात मोठी जीवघेणी सवय बनली. आजच्या काळात कोणाला सैतान मानलं जात नाही, पण फुफ्फुसाचा कॅन्सर मात्र नक्कीच सैतानासारखा पाठलाग करतो.

ज्या गोष्टीसाठी १००० वर्षांपूर्वी शिक्षा झाली, ती गोष्ट आज 'स्टेटस सिम्बॉल' बनली आहे, हे मानवी इतिहासातील सर्वात मोठे क्रूर विडंबन नाही का? .आजकाल रेल्वे स्टेशन किंवा टपरीवर उभं राहून धूर सोडणाऱ्यांना हे वाचून धक्का बसेल. रॉड्रिगोने धूर काढला म्हणून त्याला जेल झाली, पण आज आपण धुराच्या नादात स्वतःचं आयुष्यच 'जेल' (हॉस्पिटल) मध्ये ढकलत आहोत.

रॉड्रिगो सुटला तेव्हा तंबाखूने बाजारपेठ व्यापली होती, पण त्याने आपली उमेदीची ७ वर्षं अशा एका सवयीसाठी गमावली जी पुढे जगातील सर्वात मोठी जीवघेणी सवय बनली. आजच्या काळात कोणाला सैतान मानलं जात नाही, पण फुफ्फुसाचा कॅन्सर मात्र नक्कीच सैतानासारखा पाठलाग करतो.

ज्या गोष्टीसाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली, तीच गोष्ट आज 'स्टेटस सिम्बॉल' बनली आहे, हे मानवी इतिहासातील सर्वात मोठे क्रूर विडंबन नाही का?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र
लाइफस्टाइल

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

१९९१ च्या गल्फ वॉरमध्ये जळालेल्या इराकी सैनिकाचे छायाचित्र घेणारे केनेथ जारेके आणि त्या एका फोटोने मांडलेले युद्धाचे विदारक वास्तव.

२४ ऑगस्ट, २०२६

१८ बाय १४ फुटांची अंधारकोठडी आणि भारताची गुलामी: 'ब्लॅक होल ऑफ कलकत्ता'
लाइफस्टाइल

१८ बाय १४ फुटांची अंधारकोठडी आणि भारताची गुलामी: 'ब्लॅक होल ऑफ कलकत्ता'

१७५६ मधील ब्लॅक होल ऑफ कलकत्ता घटनेचा ब्रिटिशांनी कसा प्रोपोगंडा म्हणून वापर केला आणि भारताच्या गुलामीचा पाया रचला गेला.

२० जून, २०२६

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?
लाइफस्टाइल

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?

मेसोपोटेमियातील पहिल्या संग्रहालयापासून ते आजच्या आधुनिक म्युझियम्सपर्यंतचा रंजक प्रवास आणि त्याचे महत्त्व.

५ ऑगस्ट, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६