मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत; गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ?

3 मिनिट वाचन

मायकल बरी आणि पीटर थिलसारखे दिग्गज गुंतवणूकदार शेअर्स विकून बाहेर पडत असल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.

शेअर करा:
वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत; गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ?

वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत;ही भारतीय गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ आहे का?

मायकल बरी,ज्या माणसाने २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीची अचूक भविष्यवाणी केली होती,त्याने आता पुन्हा एकदा मार्केट कोसळण्यावर पैज लावली आहे. जागतिक बाजारात सध्या जी उलथापालथ सुरू आहे, ती केवळ आकड्यांचा खेळ नसून मोठ्या वादळाची नांदी ठरण्याची शक्यता आहे.मायकल बरीच्या मते ३० ते ५० टक्के—एवढी मोठी घसरण जर एनव्हिडिया (Nvidia) आणि पालान्टिर (Palantir) सारख्या 'एआय' शेअर्समध्ये झाली, तर मायकल बरी तब्बल १.५ अब्ज डॉलर्स कमावून जाईल.

'व्हॅल्युएशनचे गुरु' मानले जाणारे प्राध्यापक अश्वथ दामोदरन यांनी या आठवड्यात गुंतवणूकदारांचे कान टोचले आहेत. सध्याच्या शेअर बाजारातील कंपन्यांचे मूल्य (Valuations) इतक्या वेड्या पातळीवर पोहोचले आहे की, त्यांना आता शेअर्सपेक्षा सोन्यात किंवा प्रत्यक्ष मालमत्तेत (Tangible goods) गुंतवणूक करणं अधिक सुरक्षित वाटतंय. जेव्हा गणिताचा मास्टर स्वतः शेअर्समधून बाहेर पडण्याचा विचार करतो, तेव्हा धोक्याची घंटा वाजू लागली आहे असं समजावं का ?

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज पीटर थिलदेखील एनव्हिडियामधील आपली १०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक किमतीची गुंतवणूक विकून मोKअळे झाले आहेत. एआयच्या लाटेवर स्वार होऊन गगनाला भिडलेले हे शेअर्स आता जमिनीवर येण्याची चिन्हं दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत एनव्हिडियाचा शेअर ४ टक्क्यांनी, तर टेस्लाचा शेअर ७ टक्क्यांनी घसरला आहे. ही घसरण केवळ अमेरिकेपुरती मर्यादित राहणार नाही.

जेव्हा अमेरिकन बाजार जेव्हा शिंकतो,तेव्हा भारतासारख्या बाजारपेठांना सर्दी होते. याचे मुख्य कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदार संस्था (FIIs). अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली की, हे गुंतवणूकदार आपला पोर्टफोलिओ संतुलित करण्यासाठी भारतीय बाजारातून पैसे काढून घेतात. यामुळे भारतीय शेअर बाजारात अचानक मोठी विक्री होऊन निर्देशांक कोसळण्याची भीती निर्माण होते.

आपल्याकडे एक म्हण आहे, 'पाणी पाहून पाय सोडावेत'. शेअर बाजाराच्या बाबतीतही हेच लागू होतं. सध्या बाजारात जी तेजी दिसत आहे, त्यामागे ठोस कारणांपेक्षा 'फोमो' (FOMO - काहीतरी सुटून जाण्याची भीती) जास्त कारणीभूत आहे. विश्लेषकांच्या मते, अशा काळात आंधळेपणाने गुंतवणूक करणं महागात पडू शकतं.

जेव्हा मोठे गुंतवणूकदार बाहेर पडतात, तेव्हा सामान्य रिटेल गुंतवणूकदार सर्वात शेवटी अडकतो. मायकल बरी किंवा पीटर थिल यांच्यासारख्यांकडे नुकसानीतून सावरण्यासाठी मोठी यंत्रणा असते. पण सामान्य माणसाच्या कष्टाची कमाई एका झटक्यात स्वाहा होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या काळात 'रिस्क' घेण्यापेक्षा 'सावध' राहणं जास्त गरजेचं आहे.

जागतिक राजकारण आणि आर्थिक समीकरणं वेगाने बदलत आहेत. सोन्याचे भाव वधारत असणं हे गुंतवणूकदारांच्या असुरक्षिततेचं लक्षण आहे. जर दामोदरन यांच्यासारखे तज्ज्ञ सोन्याला पसंती देत असतील, तर बाजारात काहीतरी गंभीर शिजतंय हे नक्की.

कोणालाही भविष्य वर्तवता येत नाही आणि शेअर बाजार कधी वळण घेईल हे सांगणं कठीण असतं. पण जेव्हा वॉल स्ट्रीटचे दिग्गज आपले खिसे भरून बाहेर पडत असतात, तेव्हा आपणही आपल्या पोर्टफोलिओकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सध्याची वेळ ही आक्रमक होण्याची नसून, आपली मुद्दल सुरक्षित ठेवण्याची आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा फेरविचार करणार की लाटेसोबत वाहून जाणार?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

३७,७०० कोटींचा महा-आयपीओ: जिओ प्लॅटफॉर्म्स शेअर बाजारात इतिहास घडवणार!
लाइफस्टाइल

३७,७०० कोटींचा महा-आयपीओ: जिओ प्लॅटफॉर्म्स शेअर बाजारात इतिहास घडवणार!

रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्स ३७,७०० कोटी रुपयांचा देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत असून बाजारात मोठी हालचाल सुरू आहे.

२० जून, २०२६

शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे!
लाइफस्टाइल

शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे!

केवळ एका शेअरच्या गुंतवणुकीवर कंपन्या कशा पद्धतीने हॉटेल सवलत, फ्री फूड आणि गिफ्ट व्हाउचरचे अनोखे फायदे देतात.

६ ऑगस्ट, २०२६

कपाटातून क्लाउडपर्यंत: सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार
लाइफस्टाइल

कपाटातून क्लाउडपर्यंत: सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार

सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा मार्ग: इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) म्हणजे काय आणि ते डिजिटल युगात कसे फायदेशीर आहे, याबद्दलची माहिती.

१० मे, २०२६

साधं आणि गबाळं असणं हेच डी-मार्टचं रूप; हाच २.८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!
लाइफस्टाइल

साधं आणि गबाळं असणं हेच डी-मार्टचं रूप; हाच २.८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!

डी-मार्टचे साधे आणि अस्ताव्यस्त दिसणारे स्टोअर्स हा ब्रँडचा दोष नसून राधाकिशन दमाणी यांचा अब्जावधींचा मास्टरस्ट्रोक कसा आहे?

१९ जून, २०२६