मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

बापरे, ही बाई शरीरातल्या हृदयाशिवाय कशी जगतेय ??

2 मिनिट वाचन
शेअर करा:
बापरे, ही बाई शरीरातल्या हृदयाशिवाय कशी जगतेय ??

मंडळी, फोटोमध्ये दिसणारी महिला पाठीवर फक्त बॅग घेऊन उभी नाही.. तर ती पाठीवर तिचं हृदय घेऊन उभी आहे. सेल्वा हुसैन (वय ३९) असं या महिलेचं नाव. २०१७ च्या जुलैमध्ये तिचा हार्टफेल झालं. यावेळी तिची शारीरिक स्थिती इतकी गंभीर होती की तिचं ‘हार्ट ट्रान्सप्लांट‘ करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिला एक आर्टिफिशियल हृदय शरीराबाहेर देण्यात आलं.

मंडळी तिच्या पाठीवर असलेल्या बॅगेत तिचं हेच आर्टिफिशियल हृदय ठेवलेलं आहे. या बॅगेत दोन बॅटरींवर चालणारा पंप असून इलेक्ट्रिक मोटार बसवली आहे. या पंपातून बलूनद्वारे तिच्या शरीरातील दोन प्लास्टिक चेम्बर्समध्ये हवा पोहोचवली जाते. हे काम बेंबीपासून फुफ्फुसापर्यंत फिक्स केलेल्या २ ट्यूबद्वारे केलं जातं. अशाप्रकारे तिच्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया खरोखरच्या हृदयासारखी नियमित होत राहते.

या शिवाय सेल्वाकडे आणखी एक बॅग आहे. या बॅगेत बॅकअप युनिट ठेवलेलं असतं. जर कधी बॅगेतील सिस्टम बिघडली तर ९० सेकंदांच्या आत ही बॅकअप युनिट लावावी लागते. याच कारणाने सेल्वा एकटी बाहेर जाऊ शकत नाही. तिच्या बरोबर तिचा पती किंवा सहाय्यक असणं गरजेचं असतं.

स्रोत

सेल्वा हुसैन ही जगातली दुसरी अशी व्यक्ती आहे जिला आर्टिफिशियल हृदय बसवण्यात आलेलं आहे. या आर्टिफिशियल हृदयाची किंमत तब्बल ७४ लाख आहे. ६ तासांच्या ऑपरेशन नंतर तिला आर्टिफिशियल हृदय मिळालं. पण हे हृदय बसवण्याआधी तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या.

वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीमुळे सेल्वासारख्या महिलांना त्यांचं आयुष्य पुन्हा मिळालं आहे.

 

आणखी वाचा :

काय ? तो १८ महिने हृदयाशिवाय जगला ??

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलगंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्टबोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा
लाइफस्टाइल

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

एव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!
लाइफस्टाइल

एव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुन्को ताबेई यांचा जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास.

१६ मे, २०२६

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!
लाइफस्टाइल

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!

मदर्स डेची सुरुवात करणाऱ्या ऍना जार्विस यांनी या दिवसाच्या व्यापारीकरणाविरुद्ध दिलेला लढा आणि त्यामागचा अस्वस्थ करणारा इतिहास.

१० मे, २०२६

महाकवी कालिदासाचा गर्वहरण करणारी ती 'म्हातारी'
लाइफस्टाइल

महाकवी कालिदासाचा गर्वहरण करणारी ती 'म्हातारी'

महाकवी कालिदासाचा अहंकार एका साध्या वृद्ध महिलेने चार प्रश्नांत कसा मोडीत काढला? विद्वत्ता आणि अनुभवाची ही एक बोधप्रद कथा.

२२ मार्च, २०२६