मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

९ तासांत ३ कोलांटी उड्या आणि 'आया राम-गया राम'चा जन्म: राजकारणातला तो ऐतिहासिक किस्सा!

3 मिनिट वाचन

१९६७ मध्ये हरियाणाचे आमदार गया लाल यांनी ९ तासांत तीन वेळा पक्षांतर केले आणि भारतीय राजकारणाला 'आया राम-गया राम' ही म्हण मिळाली.

शेअर करा:
९ तासांत ३ कोलांटी उड्या आणि 'आया राम-गया राम'चा जन्म: राजकारणातला तो ऐतिहासिक किस्सा!

९ तासांत ३ कोलांटी उड्या आणि 'आया राम-गया राम'चा जन्म: भारतीय राजकारणातला तो ऐतिहासिक किस्सा !

एखाद्याला 'निष्ठेचा' चहा पाजायचा म्हटलं तरी आपण दहा वेळा विचार करतो.पण भारतीय राजकारणात मात्र ९ तासांत तीन वेळा निष्ठा बदलण्याचा जागतिक विक्रम आपल्याच मातीतल्या एका नेत्याने प्रस्थापित केलाय.

आज २३ जून २०२६, म्हणजे या घटनेला दशके उलटली तरी 'आया राम-गया राम' ही संस्कृती आजही तितकीच टवटवीत वाटते. गेल्या सात दिवसांतील बातम्यांकडे नजर टाकली तरी हेच दिसते. 'कायदेशीर' विलीनीकरण असो किंवा कोलांटीउडी मारणं असो ही कला आजही तितकीच 'इन-डिमांड' आहे.

या सगळ्या राड्याचा 'मूळ पुरुष' म्हणजे हरियाणाचे माजी आमदार गया लाल.१९६७ सालची ही गोष्ट. हरियाणात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. पलवल जिल्ह्यातील हसनपूर (आताचे होडल) मतदारसंघातून गया लाल अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्या काळी सत्ता स्थापनेसाठी अपक्षांना सोन्याचे भाव होते. गया लाल यांनी या संधीचा असा काही फायदा घेतला की, चक्क १५ दिवसांत त्यांनी ४ वेळा पक्ष बदलले.

त्यापैकी, एकाच दिवशी अवघ्या ९ तासांच्या आत त्यांनी तीन वेळा पक्षांतर केले. आधी ते काँग्रेसमध्ये गेले, तिथून संयुक्त मोर्चामध्ये आणि ९ तासांत पुन्हा फिरून काँग्रेसमध्ये! आजच्या काळात आमदार हॉटेलमध्ये 'क्वारंटाईन' होतात, पण गया लाल यांनी तर चंदीगडच्या रस्त्यांवरच पक्षांतराची मॅरेथॉन धावत होते.

त्यांच्या या विक्रमानंतर तत्कालीन काँग्रेस नेते राव बीरेंद्र सिंग यांनी चंदीगडमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. गया लाल यांना पत्रकारांसमोर उभे करून ते मिश्किलपणे म्हणाले, "गया राम अब आया राम हो गए हैं." बस, तिथूनच भारतीय राजकारणाला 'आया राम-गया राम' हा अजरामर म्हण मिळाली. राजकारणातला हा असा एक 'ब्रँड' आहे, जो आजही तितकाच लोकप्रिय आहे.

गया लाल यांनी फक्त पक्ष बदलला नाही, तर त्यांनी भारतीय राजकारण्यांना एक नवी दृष्टी दिली. 'निष्ठा' ही गोष्ट राजकारणात ती फक्त सत्तेच्या खुर्चीशी असावी, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. याच प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पुढे 'दल-बदल विरोधी कायदा' (Anti-Defection Law) आणला गेला. पण मुद्दा असा आहे की, कायद्याने फक्त 'गया राम' थांबवले, पण 'आया राम' होण्यासाठी नवनवीन पळवाटा शोधणारे 'महागुरू' आजही राजकारणात सक्रिय आहेत.फरक फक्त एवढाच आहे की, तेव्हा हे सगळं उघडपणे व्हायचं, आता त्याला 'विलीनीकरण' किंवा 'लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न' असं गोंडस नाव दिलं जातं.

गया लाल यांनी सुरू केलेली ही परंपरा आता एका मोठ्या उद्योगात रूपांतरित झाली असून, त्यातून लोकशाही किती 'मजबूत' होतेय हे काळच ठरवेल.ज्या देशात ९ तासांत तीन वेळा विचार बदलले जातात, तिथे पाच वर्षांच्या स्थिर सरकारची अपेक्षा करणे म्हणजे 'डाएट'वर असताना डब्बल साखर घालून चहा पिण्यासारखे आहे. गया लाल गेले,पण त्यांनी मागे सोडलेला हा वारसा आजही राजकारणाच्या प्रत्येक कोपऱ्यात 'ये-जा' करताना दिसतोय.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका टीव्ही शोमुळे केंद्रिय मंत्र्याला द्यावा लागला होता राजीनामा: 'जनवाणी'चा तो ऐतिहासिक ध
राजकारण

एका टीव्ही शोमुळे केंद्रिय मंत्र्याला द्यावा लागला होता राजीनामा: 'जनवाणी'चा तो ऐतिहासिक ध

१९८५ मध्ये दूरदर्शनच्या 'जनवाणी' कार्यक्रमात जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने केंद्रीय मंत्री चंदूलाल चंद्राकर यांना राजीनामा द्यावा लागला होता.

२७ जुलै, २०२६

'क्राउन'च्या रक्षणापासून लोकशाहीच्या पहाऱ्यापर्यंत: CRPF चा ८८ वर्षांचा रोमहर्षक प्रवास
राजकारण

'क्राउन'च्या रक्षणापासून लोकशाहीच्या पहाऱ्यापर्यंत: CRPF चा ८८ वर्षांचा रोमहर्षक प्रवास

१९३९ मध्ये स्थापन झालेले सीआरपीएफ आज ३.२५ लाखांहून अधिक जवानांसह जगातील सर्वात मोठे निमलष्करी दल बनून देशाचे रक्षण करत आहे.

२७ जुलै, २०२६

पत्रकारितेचा विद्यार्थी ते कुख्यात जिहादी: आफताब अन्सारीचा गुन्हेगारी प्रवास
राजकारण

पत्रकारितेचा विद्यार्थी ते कुख्यात जिहादी: आफताब अन्सारीचा गुन्हेगारी प्रवास

बीएचयूमधून शिकलेला आफताब अन्सारी खंडणीखोर बनून तिहार जेलमध्ये पोहोचला आणि तिथून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा म्होरक्या कसा बनला?

२५ जुलै, २०२६

भारतात 'पेपरफुटी' हा एवढा मोठा उद्योग कसा बनला?
राजकारण

भारतात 'पेपरफुटी' हा एवढा मोठा उद्योग कसा बनला?

लाखो विद्यार्थ्यांची स्पर्धा, मोजक्या जागा आणि 'रेंट-सीकिंग'च्या अर्थशास्त्रातून भारतात पेपरफुटीचे रॅकेट कसे फोफावले, याचे विश्लेषण.

२९ जुलै, २०२६