मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अनुपम खेर रंगवणार मनमोहन सिंह यांची भुमिका !! पाहा चित्रपटाचा फर्स्ट लुक... 

2 मिनिट वाचन
शेअर करा:
अनुपम खेर रंगवणार मनमोहन सिंह यांची भुमिका !! पाहा चित्रपटाचा फर्स्ट लुक... 

बॉलीवूडमध्ये सद्या बायोपीक्सची चलती आहे बॉस! प्रसिद्ध-कुप्रसिध्द लोकांचं जीवन पडद्यावर दाखवून बक्कळ पैसा मिळवण्याचा चंगच जणू या लोकांनी बांधलाय. पण असो, आता भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावरही चित्रपट तयार करण्यात येतोय. आणि यात मनमोहन सिंहांची भूमिका चक्क अनुपम खेर करणार आहेत भाऊ!!

मनमोहन सिंहांचे मिडीया सल्लागार म्हणून काम केलेल्या संजय बारू यांनी एक पुस्तक लिहीलं होतं. ज्याचं नाव आहे 'द अ‍ॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग अॅन्ड अनमेकींग अॉफ मनमोहन सिंह.' याच पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे आणि चित्रपटाचं नावही तेच ठेवण्यात आलंय. या पुस्तकात पंतप्रधानांच्या कारकिर्दीची तिखट शब्दात समीक्षा केली गेलीय. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून मनमोहन सिंहांचा राजकीय प्रवास पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

— Anupam Kher (@AnupamPkher) 7 June 2017

दुसरीकडे अनुपम खेर यांना भाजपा आणि मोदींचे कट्टर समर्थक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ते मनमोहन सिंहांची भूमिका रंगवणार ही बातमी लोकांना थोडी आश्चर्यात टाकणारी आहे. पण मंडळी, कलाकाराला कुठलीच बंधनं नसतात असं म्हटलं जातं. तेव्हा अनुपम सारखा कसलेला अभिनेता एका समकालीन नेत्याची भुमिका वठवताना पाहाणं ही आपल्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या थोड्या आधी, म्हणजे डिसेंबर २०१८ च्या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'निल दर्पण': या नाटकाने ब्रिटीश सत्तेचा पाया हलवला आणि भारतात 'सेन्सॉरशिप'चा कायदा आणला!
मनोरंजन

'निल दर्पण': या नाटकाने ब्रिटीश सत्तेचा पाया हलवला आणि भारतात 'सेन्सॉरशिप'चा कायदा आणला!

दीनबंधू मित्रा यांच्या 'निल दर्पण' नाटकाने ब्रिटीश राजवटीला इतके हादरवले की त्यांना भारतात पहिला सेन्सॉरशिप कायदा लागू करावा लागला.

२६ जुलै, २०२६