मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अंकल स्क्रूज परत येत आहेत, डिस्ने पुन्हा एकदा घेऊन येतंय डक टेल्स..

1 मिनिट वाचन
शेअर करा:
अंकल स्क्रूज परत येत आहेत, डिस्ने पुन्हा एकदा घेऊन येतंय डक टेल्स..

तुमच्या लहानपणी रविवारच्या सकाळी "डिस्ने आवर" बघणे कंपल्सरी होते का? अंकल स्क्रूज. त्यांचे पुतणे, लॉंचपॅड, जायरो, माजीका, बिगल बॉईज ही  सगळी नावं तुम्हाला आठवतात का? या प्रश्नांचे उत्तर जर हो असेल तर त्याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे तुमचे बालपण एकदम भारी होते आणि ही बातमी वाचून तुम्हाला नक्की आनंद होणार.

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली गोष्ट आता कन्फर्म झाली आहे. डिस्ने डक टेल्सचे नवे व्हर्जन घेऊन येत आहे. त्यात स्क्रूज मॅक-डक आपल्या हुई, ड्युई, लुई या आपल्या चुलत नातवंडासोबत दिसणार आहेत. पण आपल्याला हे बघण्यासाठी 2017 उजाडायची वाट बघावी लागणार आहे.

गेल्या काही दिवसांत आधी शक्तिमान, नंतर साराभाई आणि आता डक टेल्स परत येणार असल्याच्या बातम्या आपल्याला मिळाल्या आहेत. कदाचित हेच खरे "अच्छे दिन" असावेत

 

संबंधित लेख