मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मेलेल्या मुडद्यालाही जिवंत करेल असलं खतरनाक गाणं घेऊन आलीये 'ढिंच्याक पूजा'!!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
मेलेल्या मुडद्यालाही जिवंत करेल असलं खतरनाक गाणं घेऊन आलीये 'ढिंच्याक पूजा'!!!

अगदी मयतीतही जिच्या गाण्याने मुडदे उठतील आणि स्वतः जाऊन गाणं बंद करतील आणि पुन्हा येऊन मरतील अशी एक ऐतिहासिक गायिका आपल्या देशाला सापडली आहे, हे आपलं भाग्यचं म्हटलं पाहिजे मंडळी. फाशी देऊन किंवा विष प्यायलावर माणूस तडपून तडपून मारतो पण या गायिकेच्या गाण्याने काही क्षणात जीव जातो असलं खतरनाक गायन आहे बाईंचं. तुम्हाला तिचं नाव ठाऊक आहे का? तिचं नाव आहे ‘ढिंच्याक पूजा’.

दिल्लीच्या रहिवाशी आणि सध्या दिल्ली सोडून युट्युबवर राहायला आलेल्या या बाईंचा गळा म्हणजे अगदी खराटेदार... ‘स्वॅग वाली टोपी’, ‘दारू दारू’, आणि आता ‘सेल्फी मैंने ले ली आज’...सुमधुर संगीताचा खजाना...

राव आम्ही काय एवढं सांगत बसलोय....तुम्हीच ऐका ना हे लेटेस्ट गाणं...

 

महत्वाची सूचना : प्रेक्षकांनी हा व्हिडीओ स्वतःच्या जबाबदारीवर पाहावा. व्हिडीओ पाहून तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्यासाठी बोभाटा जबाबदार राहणार नाही !

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!
मनोरंजन

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!

बँडमध्ये वाजवताना खाल्लेला मार ते मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार; दादा कोंडके यांच्या सुरुवातीच्या संघर्षाचा एक रंजक किस्सा.

८ ऑगस्ट, २०२६