मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

भारतात रॅम्बो चित्रपटाचा रिमेक बनतोय !! पण सिल्वेस्टरने दिलाय इशारा...

2 मिनिट वाचन
शेअर करा:
भारतात रॅम्बो चित्रपटाचा रिमेक बनतोय !! पण सिल्वेस्टरने दिलाय इशारा...

रॅम्बो... नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर जॉन रॅम्बोची दे दणादण अॅक्शन दिसायला लागते. ९०च्या दशकात या हॉलीवूडपटाने अॅक्शनप्रेमींच्या मनावर गारूड घातलं होतं. प्रख्यात अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी या चित्रपटात जॉन रॅम्बोची लोकप्रिय भुमिका गाजवली होती. आता या इंग्लिश चित्रपटाचा बॉलीवूडमध्ये रिमेक बनवला जातोय !

जॉन रॅम्बो सारख्या जबरदस्त पात्राला सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी तितकाच जबरदस्त न्याय दिला. पण बॉलीवूडमध्ये असा कोण पठ्ठा आहे बरं? जो आपली पिळदार शरीरयष्टी आणि सिक्सपॅक्स दाखवून बेसुमार मारामारी आणि भारी भारी स्टंट करेल...? आहे ना राव.. आपला टायगर श्राफ !! हो, रॅम्बोच्या या इंडियन व्हर्जन मध्ये टायगर श्राफ दिसणार आहे. आहे ना परफेक्ट चॉईस? परवा कान्समध्येच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं. आणि त्यातला टायगरचा लुक बघून तरी त्याचीच निवड योग्य वाटते. याआधी हिरोपंती, बाघी सारख्या चित्रपटात टायगरची अॅक्शन तुम्ही पाहिलीच असेल.

A post shared by Sly Stallone (@officialslystallone) on

याबाबतीत सिल्वेस्टरला कळल्यानंतर त्यानेही सोशल मिडीयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "हे एक महान पात्र आहे. आशा करतो की ते त्याला बिघडवणार नाहीत." साहजिकच आहे राव ! आतापर्यंत बॉलीवूडवाल्यांनी हॉलीवूडपटांचे रिमेक बनवून त्यांची वाटच लावली आहे. आता हा रॅम्बो पण सिद्धार्थ आनंद कडून डिरेक्ट केला जातोय. (सिध्दार्थ आनंदने यापुर्वी नाईट अॅन्ड डे या चित्रपटाचा बँग बँग हा रिमेक बनवून काय केलंय ते वेगळं सांगायला नको.)

अशावेळी या चित्रपटाला न्याय देऊ शकतो तो फक्त टायगरच ! आम्हालाही त्याच्याकडून आशा आहेत. बघुया काय होतंय...

पुढची गोष्ट
मनोरंजनहॉलिवूड चित्रपटाची कॉपी मारलेले अमीर खानचे हे ६ सुपरहिट चित्रपट!वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट
मनोरंजन

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट

अभिनेत्री साधना यांची आयकॉनिक 'साधना कट' हेअरस्टाईल कशी जन्माला आली? 'लव्ह इन सिमला' सिनेमा दरम्यान घडलेला हा रंजक किस्सा.

२ सप्टेंबर, २०२६

'कॉपी' करण्यात आपण पटाईत आहोत वाटतं? मग हा १.२० कोटींचा आकडा नीट वाचा!
मनोरंजन

'कॉपी' करण्यात आपण पटाईत आहोत वाटतं? मग हा १.२० कोटींचा आकडा नीट वाचा!

बॉलिवूडच्या 'नॉक आउट' चित्रपटाने हॉलीवूडच्या 'फोन बूथ'ची कथा चोरल्यामुळे कोर्टाने १ कोटी २० लाखांचा दंड ठोठावला होता.

२३ जून, २०२६