आज ३ मे. नर्गिसची पुण्यतिथी. मूळच्या फातिमा अब्दुल रशीद या मुलीने बेबी नर्गिस या नावाने १९३५साली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या तारकेने एकापेक्षा एक सरस असे अनेक चित्रपट आपल्याला दिले. काही अपवाद वगळता सगळे सुपर हिट चित्रपट राज कपूर सोबत होते. १९५७ साली मदर इंडीया या चित्रपटासाठी नर्गिसला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता. आज बघू या नर्गिसची पाच अजरामर गाणी.
दिनविशेष: अभिनेत्री नर्गिसच्या पुण्यतिथीनिमित्त पाहूयात त्यांच्या चित्रपटातील पाच अजरामर गाणी

५. चोरी चोरी
’रोमन हॉलिडे’वरून घेतलेला हा चित्रपट अतिशय सुंदर होता. घरातून पळून गेलेल्या श्रीमंत मुलीची भूमिका नर्गिसने यात केली होती
४. श्री ४२०
या सिनेमाची कथा आणि संगीत या दोन्ही बाजू अत्यंत मजबूत होत्या. लांडीलबाडीकरून जमवलेल्या”माये’पासून नायकाला परावृत्त करणार्या ’विद्या’ची भूमिका नर्गिसने यात साकारली होती.
३. आवारा
’आवारा’ विशेषत: ’आवारा हूं’ हे गीत हा भारताव्यतिरिक्त सोव्हियत रशिया, चीन तुर्की, अफगाणिस्तान, रोमानिया या देशांतही खूपच गाजले. ’घर आया मेरा परदेसी’ हे भारतातीय सिनेमातील पहिले स्वप्नदृश्य.
२. बरसात
राज कपूर दिग्दर्शित आणि निर्मित ’बरसात’ हा राज कपूरचा पहिला सुपरहिट सिनेमा. या चित्रपटाच्या यशातूनच ’आर. के’बॅनरची निर्मिती झाली. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आणि आर. के. च्या लोगोमध्ये बरेच साम्य दिसते.
१. मदर इंडीया
भारतीय सिनेमाचा इतिहास ज्या चित्रपटांशिवाय अपूर्ण असेल, त्या सिनेमांच्या यादीत ’मदर इंडिया’ला खूप वरचं स्थान आहे. शेतकरी आणि सावकारी पाश यांवर आधारित हा सिनेमा सामाजिक मूल्यांवर आधारित होता.
टॅग्स:
संबंधित लेख

ऑलिम्पिकमध्ये सहभागी सायकलिस्टचा मृत्यू झालाय....मृत्यूपूर्वी तिने इंस्टावर खेळाडूंवरच्या तणावाबद्दल काय म्हटलं होतं?
११ ऑगस्ट, २०२१

साध्या आईसक्रिमवर प्रयोग करून त्यांनी कोटींची उड्डाणे कशी घेतली? वाचा रघुनंदन कामत यांची यशोगाथा!!
११ ऑगस्ट, २०२१

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२

बसचं रुपांतर शाळेत? कोणी आणि कुठे केलं आहे?
२४ ऑगस्ट, २०२१

