मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जेव्हा ग्रीसला नर्गिस आणि मधुबाला अक्षरशः ग्रीक देवता वाटत होत्या!

3 मिनिट वाचन

१९५० च्या दशकात हिंदी चित्रपटांनी ग्रीसवर कशी भुरळ घातली होती आणि नर्गिस-मधुबाला या अभिनेत्री ग्रीक संस्कृतीचा भाग कशा झाल्या? वाचा रंजक इतिहास.

शेअर करा:
जेव्हा ग्रीसला नर्गिस आणि मधुबाला अक्षरशः ग्रीक देवता वाटत होत्या!

ऋतिक रोशनला त्याचे फॅन ‘Greek God’ म्हणतात. पण एक काळ असा होता की ग्रीसला भारतीय चित्रपटातील्या दोन अभिनेत्री अक्षरशः ग्रीक देवता वाटत होत्या!
एक होती नर्गिस-अथेना.ग्रीक पुराणांनुसार अथेना बुद्धिचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता आहे. ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराचे ग्रामदैवत अथेना आहे.
आणि दुसरी मधुबाला-अफ्रोडाइट! प्रेम, सौंदर्य, आनंद, उत्कटता आणि प्रजोत्पादनाची देवी
हे ऐकून मनात शंका येईलच.पण ही गोष्ट खरी आहे-आणि त्यात भारताच्या जुन्या हिंदी सिनेमाच्या जागतिक प्रभावाची एक अद्भुत कहाणी दडलेली आहे.

आजचा ग्रीस म्हटला की डोळ्यांसमोर येतात निळाशार समुद्र, सॅन्टोरिनीची पांढरी घरे, पर्यटन आणि संपन्न युरोप. पण १९५०चं दशक वेगळं होतं. दुसऱ्या महायुद्धाने आणि त्यानंतरच्या यादवी युद्धाने ग्रीस अक्षरशः उद्ध्वस्त झाला होता. गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता आणि विस्थापन यांच्याशी सामान्य माणूस झुंजत होता.
आणि अशाच वेळी एका दूरच्या देशातून आलेला एक विचित्र पाहुणा ग्रीक समाजाच्या मनात शिरला—हिंदी सिनेमा!

१९५४ ते १९६८ या काळात तब्बल १११ हिंदी चित्रपट ग्रीसमध्ये प्रदर्शित झाल्याची नोंद आहे. ते फक्त अथेन्समधील मोठ्या चित्रपटगृहांतच चालत नव्हते;छोट्या शहरांत, गावांत आणि उन्हाळ्यातील खुल्या आकाशाखालील चित्रपटगृहांतही ते दाखवले जात.
ग्रीक प्रेक्षकांना पडद्यावर दिसत होते—गरीब नायक, श्रीमंत जमीनदार, अन्याय, कुटुंबातील संघर्ष, त्याग करणारी आई, दुःखी स्त्री, प्रेमासाठी झगडणारी माणसे आणि शेवटी आशेचा एखादा किरण.डोळ्यासमोर पडद्यावर भारत दिसत होता; पण त्या भारतात त्यांना स्वतःचेच दुःख दिसत होते.
म्हणूनच राज कपूरचा ‘आवारा’ त्यांना परका वाटला नाही. नर्गिसची वेदना त्यांना स्वतःची वाटली. मदर इंडिया मधली राधा म्हणजे केवळ भारतीय आई राहिली नाही; ती युद्ध आणि गरिबीने जखमी झालेल्या ग्रीक समाजातील आईचेही प्रतीक बनली.
नर्गिसला ग्रीसमध्ये कौटुंबिक नाट्यांची ‘महान नायिका’ मानले जात असे आणि मधुबालात त्या पिढीला प्रेयसी दिसत होती.आणि मग पडद्यावरचे प्रेम संगीताच्या माध्यमातून ग्रीक भाषेत उतरले.
भारतीय चित्रपटांची गाणी ग्रीक संगीतकारांनी उचलली, त्यांना ग्रीक शब्द दिले आणि नवी १००+ गाणी तयार केली. या भारतीय धाटणीच्या संगीताला एक स्वतंत्र नाव मिळालं—Indo-prepi.

पण या कहाणीचा सर्वांत विलक्षण अध्याय अजून बाकी आहे.
१९५९ मध्ये ग्रीसचा लोकप्रिय गायक Stelios Kazantzidis याने एक गाणे गायले—“Madhubala” किंवा “Mantoubala.”
आणि हेच गाणे २००३ सालच्या अथेन्स ऑलींपीकच्या समारोपाच्या सोहळ्यात पण गायले गेले होते.
थोडक्यात तुमची पिढी १९८० ची असो वा २००० सालची - मधुबाला म्हणजे फक्त मधुबालाच !!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!
लाइफस्टाइल

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!

विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.

१३ ऑक्टोबर, २०२६

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका
लाइफस्टाइल

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका

मध्ययुगीन काळात हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अ‍ॅक्वामॅनिल' झारीची आणि त्यावर कोरलेल्या ॲरिस्टॉटल-फिलीसच्या कथेची गोष्ट.

१६ ऑक्टोबर, २०२६