मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अनुष्काचा नंबर हवाय? या लिंकवर क्लिक करा!!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
अनुष्काचा नंबर हवाय? या लिंकवर क्लिक करा!!!

नमस्कार!!! कसे आहात सगळे? मजेत ना? आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न.  

मंडळी, वाचताय ना? वाचलंच पाहिजे. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक धमाका. अनुष्का शर्माचा व्हॉट्सअॅप नंबर. बरोबर ऐकलंत! तुम्ही आता अनुष्काशी बोलू शकता, गप्पा मारू शकता, एवढंच नाही तर तिच्याशी तुम्ही व्हिडीओ चॅटसुद्धा करू शकता. आम्ही तुमची फिरकी वगैरे काही घेत नाही आहोत आणि आम्ही पिऊन सुद्धा नाही आलोय. ही बातमी २००० च्या नव्या नोटेएवढीच खरी आहे.

हल्ली सिनेमा हिट करण्यासाठी मार्केटिंगचे नवीन नवीन तगडे फंडे काढले जात आहेत. यातच अनुष्का शर्माचा आगामी सिनेमा ‘फिलौरी’ साठी सिनेमाच्या निर्मात्यांनी हटके आयडिया काढत लोकांना (विराटलासुद्धा) झटके देण्याच ठरवलं आहे. फिल्म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनुष्का व्हॉट्सअपद्वारे लोकांशी बोलताना दिसेल. स्वतः अनुष्काने याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.

प्रमोशनसाठी हा मार्ग निवडण्यायामागचं एक कारण म्हणजे तिची भूमिका. या फिल्म मध्ये अनुष्का ‘शशी’ नावाच्या एका ‘फ्रेंडली’ भुताचा रोल करताना दिसणार आहे. कदाचित याचसाठी तिने टीव्ही, इवेंटमध्ये फिल्मचे प्रमोशन करण्यापेक्षा व्हॉट्सअॅपचा मार्ग निवडला असणार. याला ‘इनवीजीबल प्रमोशन’ म्हणू शकतो. हा सिनेमा २४ मार्च २०१७ ला रिलीज होतोय !

तर 9867473178 हा आहे तो नंबर. यापुढे काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगायला नको.

संबंधित लेख