अभिनंदन गीता गोपीनाथ - एक भारतीय महिला IMF च्या मुख्य अर्थतज्ञ !!

२०१४ साली इंटरनॅशनल मॉनीटरी फंड या जागतिक संस्थेने २५ तरुण अर्थतज्ञांची यादी जाहीर केली होती. येत्या काही वर्षांमध्ये जागतीक अर्थकारणावर ज्यांच्या विचारांचा आणि अभ्यासाचा पगडा असू शकेल अशा २५ जणांची ती यादी होती. हे चार भारतीय  होते . राज चेट्टी आणि गीता गोपीनाथ (हार्वर्ड विद्यापीठ), पराग पाठक (एमआयटी) आणि अमित सेरु (शिकागो विद्यापीठ).

यापैकी गीता गोपीनाथ या भारतीय-अमेरीकन महिलेची काल इंटरनॅशनल मॉनीटरी फंड- आयएमएफने मुख्य अर्थतज्ञ म्हणून नेमणूक केली आहे.  गीता गोपीनाथ यांचा जन्म कर्नाटकात झाला. दिल्लीच्या श्रीराम कॉलेज मधून बीए केल्यावर देदिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमीक्स मधून त्यांनी एमए केले. त्यानंतर अमेरीकेत वॉशिंग्टन विद्यापीठात पुन्हा एकदा मास्टर्सची पदवी घेतली आणि प्रिंस्टन विद्यापीठातून डॉक्टरेट (पीएचडी) मिळवली. या दरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांनामिळाले आहेत.

गीता गोपीनाथ यांचा अभ्यास मॅक्रोइकॉनॉमिक्स, आंतरराष्ट्रीय कर्ज- आंतरराष्ट्रीय चलनाचा तौलनीक अभ्यास - अशा अनेक  क्षेत्रात आहे.

आयएमएफच्या अध्यक्षा क्रिस्टीन लगार्दे यांनी गीता गोपीनाथ यांची मुख्य अर्थतज्ञ म्हणून नेमणूक करताना असे म्हटले आहे

क्रिस्टीन लगार्दे (स्रोत)

“Gita is one of the world’s outstanding economists, with impeccable academic credentials, a proven track record of intellectual leadership, and extensive international experience,” Ms. Lagarde said. “All this makes her exceptionally well-placed to lead our Research Department at this important juncture. I am delighted to name such a talented figure as our Chief Economist.”

या अगोदर आयएमएफचे मुख्य अर्थतज्ञ असण्याचा मान रघुराम राजन आणि कौशिक बसू  यांना मिळाला होता.

मूळच्या भारतीय गीता गोपीनाथ आजही भारतापासून फार दूर नाहीत. केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या त्या अर्थविषयक सल्लागार म्हणून त्या आजही काम करतात.

"बोभाटा" तर्फे गीता गोपीनाथ यांचे अभिनंदन !!

सबस्क्राईब करा

* indicates required