मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

शेअबाजाराचे काही नियम : नियम पाळा आणि यशस्वी व्हा.

3 मिनिट वाचन
शेअर करा:
शेअबाजाराचे काही नियम : नियम पाळा आणि यशस्वी व्हा.

शेअरबाजारात पैसे कमवायचे आणि जमवायचे असतील तर काही नियम पाळायलाच हवेत.सध्याच्या समाज माध्यमाच्या काळात बातम्या काही क्षणात जगाच्या या टोकापासून त्या टोकाला पोहचत असतात.हे लक्षात घेऊन आजचा हा पहिला नियम वाचा,तो पाळा आणि नंतरच पैसे गुंतवायचा विचार करा.


नियम असा आहे की बाजारातल्या कहाण्यांवर फक्त १० मिनिटं विश्वास ठेवायचा आणि त्या विसरून जायच्या.आता या कहाण्या कशा असतात ते ही समजून घ्या.फेसबुक चाळता चाळता- किंवा व्हॉट्सॅपच्या फॉरवर्ड  पोस्टमध्ये अचानक एक पोस्ट दिसते 'सहा महिन्यात या शेअरने केले या लोकांना करोडपती '- अशा कहाण्या प्रेरित करतात हे खरेच आहे पण ही या बातमीची एक बाजू झाली. याच बातमीची  दुसरी बाजू अशी असते  की 'त्याच शेअरने केले 'सहा महिन्यात *  करोडपतींना केले लखपती'.लक्षात घ्या या बाजारात फक्त  एकाचा पैसा दुसर्‍याकडे जात असतो. जेव्हा एका माणसाचा फायदा होतो तेव्हा अनेक लोक थोडेथोडे नुकसान सहन करत असतात.अगदी शास्त्रीय परिभाषेत सांगायचं झालं तर शेअरबाजार हा Zero-Sum Game आहे. Zero-Sum Game म्हणजे एकाचे नुकसान झाल्याशिवाय दुसर्‍याचा फायदा होणारच नाही.

थोडक्यात बाजाराचे मन ओळखून खेळी करणं आणि आपल्या मनाप्रमाणे फायदा घेऊन वेळीच बाहेर पडणं हे तंत्र आत्मसात केलेच पाहीजे.

मोर्चात कधी सामील व्हायचं आणि कधी कलटी मारून घरी जायचं हे काही जणांना नेमकं जमतं तेच तंत्र इथे वापरायचे असते. ते समजण्याआधी बाजाराच्या सामूहिक मानसिक आंदोलनाचा अभ्यास करावा लागतो. ते जमलं की एंट्री आणि एक्झिटची दरवाजे कोणते ते कळतं.

शेअबाजाराचे काही नियम : नियम पाळा आणि यशस्वी व्हा. – चित्र 1

आता बाजाराचा दुसरा नियमही वाचून घ्या.शेअरबाजारात गुंतवणूक करताना तुमची नेमकी भूमिका काय आहे ते आधीच ठरवून घ्या.

तुम्ही कामधंदा सांभाळून दिर्घ मुदतीची गुंतवणूक करणार आहात की रोज रोज खरेदी विक्री करून ट्रेडींग करणार आहात,ते आधीच ठरवा.

दिर्घ काळासाठी गुंतवणूक करत असाल तर दिवसातून दहा वेळा घेतलेल्या शेअरचे भाव तपासत बसू नका.त्यासाठी दिर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी गुगलवर असलेली 'अ‍ॅलर्ट' ची सुविधा वापरावी. ही सुविधा तुम्ही ज्या कंपनीचे शेअर घेतले असतील त्या कंपनीबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक बातम्या सतत कळवत राहते.

साहजिकच निर्णय घेणे सोपे होते.

दुसरी भूमिका असते ट्रेडरची -

तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तरच ट्रेडर व्हा. तुम्हाला ट्रेडर म्हणून काम करायचे असेल तर अपेक्षित नफ्यातोट्याचे प्रमाण ठरवूनच व्यवहार करा.तोटा कमी होण्यासाठी जी मर्यादा असते त्याला 'स्टॉप लॉस' असे म्हणतात.सुरुवातीला ती मर्यादा पाळणे मानसिकदृष्ट्या कठीण जाते पण सवय घालून घ्या.थोडक्यात सांगायचे तर शिस्तीचे पालन करा ! 

 

शेअबाजाराचे काही नियम : नियम पाळा आणि यशस्वी व्हा. – चित्र 2

आता आजचा गृहपाठ :

१) दिर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी मनास येतील त्या पाच कंपन्याचे अ‍ॅलर्ट गुगलवर सेट करा.येता संपूर्ण आठवडा येणार्‍या बातम्या वाचा.
२) ट्रेडर व्हायचे असेल तर मनास येतील त्या पाच कंपन्यांच्या भावावर नजर ठेवा.

आता हे भाव म्हणजे नेमके कोणते ते पण समजून घ्या.
ओपन- सकाळी बाजार उघडतो तेव्हाचा भाव 
हाय- दिवसभरात जास्तीताजास्त झालेला भाव
लो- दिवसभरातील कमीतकमी झालेला भाव 
क्लोज - बाजार बंद होतानाचा भाव.


लक्षात घ्या क्लोजींगचा भाव हे अंतिम सत्य असते. ते कसे ते आपण पुढच्या भागात वाचू या !

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मोदी-मेलनींची ती 'मेलडी' आणि दलाल स्ट्रीटवरची 'कॉमेडी'!
लाइफस्टाइल

मोदी-मेलनींची ती 'मेलडी' आणि दलाल स्ट्रीटवरची 'कॉमेडी'!

पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलनी यांच्या 'मेलडी' चर्चेमुळे गुंतवणूकदारांनी चुकून पार्ले इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केल्याची रंजक गोष्ट.

२१ मे, २०२६

'ॲव्होकॅडो'चा भारतीय बाजारात धुमाकूळ: आरोग्याचा नवा 'ट्रेंड' की केवळ महागडा फॅड?
लाइफस्टाइल

'ॲव्होकॅडो'चा भारतीय बाजारात धुमाकूळ: आरोग्याचा नवा 'ट्रेंड' की केवळ महागडा फॅड?

महागडे विदेशी फळ असणाऱ्या ॲव्होकॅडोची भारतात वाढती मागणी आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी सविस्तर माहिती.

३१ जुलै, २०२६

वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत; गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ?
लाइफस्टाइल

वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत; गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ?

मायकल बरी आणि पीटर थिलसारखे दिग्गज गुंतवणूकदार शेअर्स विकून बाहेर पडत असल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.

२५ जून, २०२६