मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

तुम्ही पाहाताय त्या गोष्टी होऊ शकणार आपोआप रेकॉर्ड - तंत्रज्ञानाची आणखी एक झेप

2 मिनिट वाचन
शेअर करा:
तुम्ही पाहाताय त्या गोष्टी होऊ शकणार आपोआप रेकॉर्ड - तंत्रज्ञानाची आणखी एक झेप

आजकाल कुठेही गेलं की फोटो काढायला फोन-कॅमेरे सरसावतात. बरेचदा फोटो काढण्याच्या नादात मूळ गोष्टीचा आस्वाद घेणं राहून जातं. मग डोळ्यात आपोआप दिसणारी गोष्ट टिपणारं आणि हवं तेव्हा ते परत दाखवणारं तंत्रज्ञान आलं तर? मानवाला असलेला विस्मरणाचा शाप पुसून जाईल. आनंदाचे, आपुलकीचे, आवडत्या माणसांसोबतचे क्षण सहजरीत्या साठवून ठेवता येतील. स्टिंग ऑपरेशन करणार्‍या लोकांचं काम सोपं होईल, आणि बरंच काही होईल. 

 जगप्रसिद्ध  सोनी कंप्नी बनवतेय  व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारी कॉन्टॅक्ट लेन्स. या लेन्सवरच्या सर्किट्मुळे व्हिडिओ रेकॉर्ड तर करता येतीलच, आणि ते पुन्हा पुन्हा पाहाता ही येतील. 

 

 पण खरं सांगायचं तर त्यामुळं माणसांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरती मोठा घाला येईल. कटू घटना परत-परत पाहून त्यावरून लोकांशी सतत वाद आणि भांडणं होऊ शकतील. आपल्याला कुणी रेकॉर्ड तर करत नाही ना, या भयाच्या छायेखाली सतत वावरावं लागू शकेल.


अर्थात , असं करता येईल  का ही संकल्पना नवीन नाही. ’ब्लॅक मिरर’ या ब्रिटिश मालिकेने ’द एंटायर हिस्ट्री ऑफ युवर्स’ या भागात ही संकल्पना आणि तिचे दुष्परिणाम  आधीच दाखवून झाले आहेत. हेच नव्हे तर भविष्यातल्या आणखी काही तांत्रिक शोधांचा मानवी जीवनावर काय परिणाम होईल हे ही त्यांनी सांगोन झालंय. मराठीतून वाचा ’ब्लॅक मिरर’ बद्दल अधिक माहिती.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइललंडनच्या लिलावात रेकॉर्डब्रेक किंमतीत विकली गेली टिपू सुलतानाची तलवार ! वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख

५ किलोमीटर लांब तिरंगा आणि दोन जागतिक विक्रम; हरयाणाने रचला इतिहास!
लाइफस्टाइल

५ किलोमीटर लांब तिरंगा आणि दोन जागतिक विक्रम; हरयाणाने रचला इतिहास!

पलवलमध्ये ५ किलोमीटर लांब तिरंगा पदयात्रेचे आयोजन करून हरयाणाने एकाच दिवशी दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स नोंदवले.

१७ ऑगस्ट, २०२६

'इबू बॅरोन': २४ फूट लांबीचा महाकाय अजगर आणि थरारक जागतिक विक्रम!
लाइफस्टाइल

'इबू बॅरोन': २४ फूट लांबीचा महाकाय अजगर आणि थरारक जागतिक विक्रम!

इंडोनेशियाच्या जंगलात सापडलेल्या 'इबू बॅरोन' नावाच्या मादी अजगराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे सर्व जुने विक्रम कसे मोडीत काढले, वाचा.

१२ मार्च, २०२६