मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ती मेट्रो ३० फुटांवरून खाली कोसळणारच होती, पण... कुठे आणि काय घडलं होतं?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
ती मेट्रो ३० फुटांवरून खाली कोसळणारच होती, पण... कुठे आणि काय घडलं होतं?

देव तारी त्याला कोण मारी? अशी आपल्याकडे म्हण आहे. ही म्हण सार्थ करून दाखवणारा योगायोग नुकताच म्हणजे सोमवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी नेदरलँड्स मध्ये घडला आहे. अगदी एखाद्या हॉलिवूडच्या सिनेमातला वाटावा असा. तिथली डच मेट्रो ट्रेन स्पिजकेनीस येथील डी अकर्स या शेवटच्या स्टेशनपाशी आल्यावर थेट एलिव्हेटेड ट्रॅकच्या शेवटपर्यंत गेली आणि सुमारे ३० फुटांवरून खाली कोसळणार इतक्यात तिथे असलेल्या एका शिल्पाकृतीच्या आधाराने अलगद विसावली. 

ती मेट्रो ३० फुटांवरून खाली कोसळणारच होती, पण... कुठे आणि काय घडलं होतं? – चित्र 1

पाण्यात सूर मारताना देवमासा जसा दिसेल तशा आकारातलं हे देवमाशाच्या शेपटीचं शिल्प म्हणजेच 'व्हेल्स टेल' २००२ मध्ये रॉटरडॅम शहराच्या बाहेर असलेल्या स्पिजकेनीसमधील डी अकर्स येथे उभारलं गेलं. रेल्वे ट्रॅकच्या टोकाशी असलेल्या या कलाकृतीला नावही अगदी अचूक देण्यात आलं आहे - सेव्ह्ड बाय व्हेल्स टेल! सोमवारी त्याने आपलं नाव सार्थ करून दाखवलं. 

ती मेट्रो ३० फुटांवरून खाली कोसळणारच होती, पण... कुठे आणि काय घडलं होतं? – चित्र 2

हे घडलं त्यावेळी ट्रेनमध्ये प्रवासी नव्हते, होता फक्त चालक. तोही या अपघातातून सहीसलामत वाचला आहे. जे काही थोडंफार नुकसान झालं तेवढंच. मात्र ही गाडी शेवटच्या थांब्यापाशी आल्यावरही थांबली कशी नाही हे अजूनही कोडंच आहे. ही ट्रेन रात्रभर आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आली आणि मंगळवारी सकाळी तिला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला गेला. 

जवळपास २० वर्षं जुन्या आणि बांधणीत मुख्यतः प्लॅस्टिक वापरलेल्या या शिल्पाने मेट्रो ट्रेनचा आपल्यावरचा भार तोलून कसा धरला याचं मात्र सगळ्यांनाच विशेष वाटतंय.

 

लेखिका : स्मिता जोगळेकर

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलमोबाईलचा क्लाऊड स्टोरेजमध्ये डेटा बॅकअपही घेता की नाही? घेत नसाल तर लगेच जाणून घ्या नक्की कसे आणि काय करायचे...पुढच्यावेळी मोबाईल बदलला तरी कॉन्टॅक्ट्स, रिमांईंडर्स, फोटो, व्हॉट्सॲप मेसेजेस सगळे आपोआप नव्या फोनमध्येही येईल.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख

अमेरिकेतून नेपाळला परतणार १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे दुर्मिळ शिल्प
लाइफस्टाइल

अमेरिकेतून नेपाळला परतणार १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे दुर्मिळ शिल्प

नेपाळमधून तस्करी करून अमेरिकेत नेलेले १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे ऐतिहासिक शिल्प आता पुन्हा मायदेशी परतणार आहे.

२० मार्च, २०२६