मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आईच्या व्हॉट्सऍप स्टेटसमुळे चोर कसा पकडला गेला ?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
आईच्या व्हॉट्सऍप स्टेटसमुळे चोर कसा पकडला गेला ?

नवी वस्तू हातात आली रे आली की सोशल मीडियावर स्टेटस टाकून इतरांपुढे ती मिरवण्याची लोकांना काय ती हौस!! पण याच सोशल मीडियामुळे हवा होत असली तरी कधीकधी गोष्ट अंगलटदेखील येऊ शकते.

याचा चांगलाच अनुभव एका बाईला हैदराबाद येथे आला आहे. या बाईच्या मुलाने तिच्यासाठी सोन्याचे दागिने आणले या आनंदात तिने दागिने घालून काढलेले फोटो व्हॉट्सऍप स्टेटसला ठेवले. पण हे दागिने मुलाने विकत नाही, तर चोरून आणले होते ही गोष्ट त्या बिचाऱ्या बाईला माहीत नव्हती.

आईच्या व्हॉट्सऍप स्टेटसमुळे चोर कसा पकडला गेला ? – चित्र 1

तुले बाईचे स्टेटस त्यांचे शेजारी असलेल्या अंगिदी रविकिरण यांना दिसले. रविकिरण यांच्या घरी गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एक घटना घडली होती. एकेदिवशी ते मंदिरात गेले होते, तिकडून परत आल्यावर त्यांचे घर त्यांना उघडे दिसले. त्यांनी विचार केला आपण घर उघडे सोडून गेलो असणार. पण घरात गेल्यावर त्यांच्या लक्षात आले, आपल्या घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. त्यांनी या गोष्टीची पोलिसात तक्रार देखील नोंदवली होती. आता बाजूच्या घरात राहणाऱ्या बाईच्या व्हाट्सऍप स्टेटसला तेच दागिने दिसल्यावर त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

रविकिरण यांनी पोलीस स्टेशन गाठले, पोलिसांनी चौकशी केली असता त्या बाईचा मुलगा जितेंद्र यानेच चोरी केली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला तर बेड्या ठोकल्याच, पण त्याच्या आईलादेखील नोटीस पाठवली आहे.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलआज व्हॉट्सॅपचा 'हॅप्पी बड्डे' आहे२४ फेब्रुवारी हा दिवस तंत्रज्ञान विश्वासाठी खास आहे. याच दिवशी स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म झाला आणि व्हॉट्सॲपचीही सुरुवात झाली.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख

शक्तिमानची जादू आणि पार्ले-जीने काबीज केलं तामिळनाडूचं मार्केट!
लाइफस्टाइल

शक्तिमानची जादू आणि पार्ले-जीने काबीज केलं तामिळनाडूचं मार्केट!

९० च्या दशकात तमिळनाडूमध्ये मिल्क बिस्किटांचे वर्चस्व असताना शक्तिमानच्या मदतीने पार्ले-जीने विक्री ५० वरून २ हजार टनांवर कशी नेली?

२२ जून, २०२६

स्टेटस सिंबल ते 'सायलेंट किलर': गुटक्याचा रक्ताळलेला इतिहास
लाइफस्टाइल

स्टेटस सिंबल ते 'सायलेंट किलर': गुटक्याचा रक्ताळलेला इतिहास

एकेकाळी श्रीमंतीचे लक्षण मानल्या जाणाऱ्या पानपराग आणि माणिकचंद गुटक्याचा रक्ताळलेला इतिहास आणि त्याचा सामाजिक आरोग्यावर झालेला परिणाम.

२३ मार्च, २०२६