मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

पंपावर CNG भरताना वाहनात बसून राहावे की उतरावे? प्रत्येक पंपावर वेगळे नियम, नक्की करावे तरी काय?

3 मिनिट वाचन
शेअर करा:
पंपावर CNG भरताना वाहनात बसून राहावे की उतरावे? प्रत्येक पंपावर वेगळे नियम, नक्की करावे तरी काय?

ओला-उबर आणि टॅक्सीवाल्या लोकांना पेट्रोल-डिझेलऐवजी CNG च परवडतो. पण CNG पंपांचीसंख्या इतकी कमी असते की बिचाऱ्यांचा अर्धा वेळ चांगल्या गॅस प्रेशरचा CNG पंप शोधण्यात आणि राहिलेला तिथं आपला नंबर कधी येतो याची वाट पाहण्यात जातो. बरं, या CNG पंपांवर प्रत्येक ठिकाणी सारखे नियम नसतात. काही ठिकाणी गॅस भरताना खाली उतरा म्हणतात तर काही ठिकाणी काही गरज नाही म्हणता.
मग, खरं काय? उतरावं की उतरु नये? याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या लेखात तुम्हांला मिळेल.

पेट्रोलच्या वाढत्या किंमत पाहून, ऐकून आपल्याला घाम फुटतो. रोजच्या रोज वाढत जाणारा आकडा पहिला की आपल्या महिन्याचे खर्चाचे गणित कोलमडते. पेट्रोलसाठी स्वस्त पर्याय म्हणून अनेकजण CNG वापरतात.CNG मुळे बराच प्रवास खर्च वाचतो. त्यामुळे रोजच्या रोज प्रवास करणारे CNG कार घेताना दिसतात.

CNG पर्याय स्वस्त आहे आणि पेट्रोल किंवा डिझेल कारपेक्षा कमी उत्सर्जन करते. CNG म्हणजे Compress Natural Gas. हा गॅस अस्थिर आहे म्हणजे भरताना पुढे काय होईल हे सांगता येत नाही. हा भरताना दाबामुळे तापू शकतो किंवा गळतीमुळे आग लागू शकते. कधी कधी तर फुटून स्फोट ही होऊ शकतो. या कारणामुळे तुमचे वाहन पेटू शकते आणि अपघात घडू शकतो.

पंपावर CNG भरताना वाहनात बसून राहावे की उतरावे? प्रत्येक पंपावर वेगळे नियम, नक्की करावे तरी काय? – चित्र 1

दुसरे कारण म्हणजे CNG च्या वासामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. गॅस भरताना येणारा आवाज आणि वास दोन्ही तीव्र असतात. जर तुम्ही कारमध्ये असाल बरेचदा गुदमरल्यासारखे वाटते. या कारणामुळे वाहनातून बाहेर थांबणे जास्त महत्वाचे असते.

आणखी एक कारण म्हणजे सीएनजी पंपाचे मीटरही पेट्रोलपंपाच्या मीटरपेक्षा वेगळे असते. ते तपासून घ्यावे. त्यात कोणतीही फेराफेरी केली जात नाही हे टाळण्यासाठी मीटर तपासण्यासाठी कारमधून बाहेर पडण्यास सांगितले जाते.

अजून एक महत्वाची सूचना की फक्त वाहनचालकाने बाहेर पडावे असे नाही, तर त्याच्याबरोबर जे प्रवासी असतील त्यांनीही पेट्रोल स्टेशनपासून दूर थांबणे जास्त सुरक्षित असते.

तुमच्या कारमधील CNG किट ही गॅससाठी चार्ज-डिस्चार्ज सिस्टम आहे. रिफिलिंग करताना, तुमच्या कारच्या आत 200 पेक्षा जास्त बार दाबला जातो. हा दाब इतका जास्त असतो की कोणताही क्रॅक फुटू शकतो किंवा त्यात गळतीमुळे आग लागू शकते.

सीएनजी पंपावर काही नियम पाळले पाहिजेत, याची माहिती लिहिलेली असते. पण त्याबद्दल फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. यामुळेच अनेक अपघातांना तुम्ही आमंत्रणच देत असता. परंतु वर दिलेल्या सर्व कारणांमुळे सीएनजी भरताना नेहमी कारमधून बाहेर पडावे असे सांगितले जाते. त्यामुळे अपघातापेक्षा सावधगिरी बाळगणे सोपे नाही का?

शीतल दरंदळे

पुढची गोष्ट
लाइफस्टाइल४० दिवसांनंतर प्यायलेला वीरू, त्याची बसंती आणि पाण्याची टाकी... तुम्हांला काय वाटतं, पुढे काय झालं असेल??वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

“Staying ahead of the curve” म्हणजे काय? प्रवाहाच्या पुढे असण्याचं एकाकीपण?
लाइफस्टाइल

“Staying ahead of the curve” म्हणजे काय? प्रवाहाच्या पुढे असण्याचं एकाकीपण?

समाजाच्या प्रवाहाच्या पुढे राहणाऱ्या ५ टक्के लोकांची मानसिकता आणि त्यांना सोसावं लागणारं एकाकीपण यावर भाष्य करणारा हा लेख.

२८ मार्च, २०२६